Portugal Beats Ghana: थरारक सामन्यात पोर्तुगालची बाजी; क्रिस्तियानो रोनाल्डोने नोंदवला विक्रम

घाना संघावर 3-2 गोल फरकाने मात; घाना संघाचा तोडीस तोड खेळ
Portugal Beats Ghana
Portugal Beats GhanaDainik Gomantak

Portugal Beats Ghana: फिफा वर्ल्डकप स्पर्धेत ग्रुप एच मध्ये गुरूवारी झालेला पोर्तुगाल विरूद्ध घाना हा सामना थरारक झाला. फर्स्ट हाफमध्ये एकही गोल नसताना सेकंड हाफमध्ये दोन्ही संघातील खेळाडुंनी अक्षरशः तोडीस तोड खेळ करत सामना रंगवला. अखेर या थरारक सामन्यात क्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने 3-2 अशा गोलफरकाने घाना संघावर मात केली. रोनाल्डोने या सामन्यात गोल नोंदवत अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

(FIFA World Cup 2022)

Portugal Beats Ghana
Uruguay vs Korea Republic: उरूग्वे-कोरिया सामनाही बरोबरीत

या सामन्यात सर्वांचे लक्ष पोर्तुगालचा स्टार खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो याच्यावर होते. कारण हा वर्ल्डकप रोनाल्डोसाठी अखेरचा असणार आहे. पुढच्या वर्ल्डकपमध्ये रोनाल्डो पोर्तुगाल संघाचा भाग नसेल. सामन्याच्या 65 व्या मिनिटाला क्रिस्तियानो रोनाल्डो याने पेनल्टीवर गोल करून पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली.

रोनाल्डोचा विक्रम

घानाच्या डी मध्ये सलिसूने याने रोनाल्डोला पाडले. त्यामुळे पंचांनी पोर्तुगालला पेनल्टी बहाल केली. त्यावर पोर्तुगालचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर क्रिस्तियानो रोनाल्डो याने 65 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल नोंदवला. दरम्यान, रोनाल्डोचा हा विक्रमी गोल आहे. हा त्याचा 118 वा आंतरराष्ट्रीय गोल असून आंतरराष्ट्रीय गोलच्या बाबतीत रोनाल्डो अव्वल स्थानी आहे. दरम्यान, 5 फिफा वर्ल्डकपमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा जगातील पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. रोनाल्डोने 2006, 2010, 2014 आणि 2018 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतही गोल नोंदवला होता.

त्यानंतर 73 व्या मिनिटाला घानाच्या अँड्रे आयेव याने गोल नोंदवून घानाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर 78 व्या मिनिटाला पोर्तुगालच्या जोआओ फेलिक्स याने गोल नोंदवत पोर्तुगालची आघाडी वाढवली. आणि लगेचच 80 व्या मिनिटाला पोर्तुगालच्या राफेल लिआओ याने गोल करत पोर्तुगालची आघाडी आणखी वाढवली. ही आघाडी घाना संघाला अखेरपर्यंत फेडता आली नाही. पण 89 व्या मिनिटाला घानाच्या ओसमान बुकारी याने गोल करत पोर्तुगालची आघाडी 3-2 अशी आणली. त्यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली होती. पण अखेरच्या वेळेत आणि भरपाई वेळेत ही आघाडी कायम राहिली.

Portugal Beats Ghana
Viral Vidio of Japan's Fans: जपानच्या खेळाडुंनी सामना जिंकला; तर चाहत्यांनी जिंकली मने...

तत्पुर्वी फर्स्ट हाफमध्ये कोणताही संघ गोल करू शकला नाही. दोन्ही संघांच्या फॉरवर्ड खेळाडूंना प्रतिस्पर्धी संघांच्या डिफेंडर्सनी संधीच दिली नाही. दरम्यान फर्स्ट हाफमध्ये चेंडूवर 70 टक्के नियंत्रण पोर्तुगालनेच राखले. पोर्तुगालने फर्स्ट हाफमध्ये सातवेळा चेंडू गोलपोस्टकडे मारला, त्यातील दोन वेळा चेंडू टारगेटवर होता मात्र गोलकीपरने उत्कृष्ट बचाव केला.

पोर्तुगाल फिफा रँकिंगमध्ये नवव्या स्थानावर आहे तर या रँकिंगमध्ये घाना हा संघ 61 व्या स्थानी आहे. यापुर्वी 2014 फिफा वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेडमध्येच पोर्तुगाल आणि घाना या दोन संघांमध्ये सामना झाला होता. त्यावेळी पोर्तुगालने 2-1 अशा गोलफरकाने घाना संघाला पराभूत केले होते. तेव्हा देखील रोनाल्डोनेच विनिंग गोल मारला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com