कोविडमुळे गोव्यातील फुटबॉल मोसम स्थगित

कोविड-19 बाधितांत लक्षणीय वाढ झाल्यामुळे सध्या सुरू असलेल्या गोवा प्रोफेशनल लीग आणि पाचव्या महिला फुटबॉल लीग स्पर्धेतील सामने पुढील आदेशापर्यंत स्थगित
कोविडमुळे गोव्यातील फुटबॉल मोसम स्थगित

postponed football season in Goa because of covid-19

Dainik Gomantak

पणजी: राज्यातील कोविड (covid-19) बाधितांची टक्केवारी वाढल्यामुळे गोवा फुटबॉल (Football Association) असोसिएशनने (जीएफए) 2021-22मोसम काही काळ स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यात मंगळवारी 24 तासातील कोविड पॉझिटिव्हिटी दर 13.89 टक्के होता, तर त्यापूर्वी पॉझिटिव्हिटी दर 26.43 टक्के इतका होता.

<div class="paragraphs"><p>postponed football season in Goa because of covid-19</p></div>
सौराष्ट्रचे माजी क्रिकेटपटू अंबाप्रतसिंहजी जडेजा यांचे कोविड-19 निधन

कोविड-19 बाधितांत लक्षणीय वाढ झाल्यामुळे सध्या सुरू असलेल्या गोवा प्रोफेशनल लीग आणि पाचव्या महिला फुटबॉल लीग स्पर्धेतील सामने पुढील आदेशापर्यंत तात्पुरते स्थगित करण्याचे जीएफएने मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे आता पुढील निर्णयापर्यंत गोव्यात पुढील सामने खेळले जाणार नाहीत.

<div class="paragraphs"><p>postponed football season in Goa because of covid-19</p></div>
IPL 2022: 'या' नव्या IPL संघाचा आशिष नेहरा असणार मुख्य प्रशिक्षक, गॅरी कर्स्टन मेंटर

जीएफए प्रोफेशनल लीग (GFA Professional League) स्पर्धेला गेल्या वर्षी 16 ऑक्टोबरला सुरवात झाली. सध्या स्पर्धा मध्यास आहे. महिला फुटबॉल लीगही सध्या अर्ध्यावर आहे. यापूर्वी 2019-20 मोसमातील प्रोफेशनल लीग स्पर्धा कोरोना विषाणू महामारीमुळे अर्धवट राहिली होती. गतमोसमात ही स्पर्धा पूर्ण झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com