आयपीएल 2021 मध्ये समावेश होणारा नववा संघ कोणता ? लिलावही नव्याने होणार

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलचा २०२० चा मोसम संपण्यापूर्वीच २०२१ च्या मोसमाची पूर्वतयारी केली होती. भारतीय मंडळाने फ्रॅंचाईजना या मोसमाबाबत पूर्वकल्पनाही होती. त्यानुसार २०२१ च्या मोसमासाठी पूर्ण लिलाव होणार आहे, त्याचबरोबर ही लीग आठऐवजी नऊ संघांची असेल.

नवी दिल्ली / मुंबई :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएलचा २०२० चा मोसम संपण्यापूर्वीच २०२१ च्या मोसमाची पूर्वतयारी केली होती. भारतीय मंडळाने फ्रॅंचाईजना या मोसमाबाबत पूर्वकल्पनाही होती. त्यानुसार २०२१ च्या मोसमासाठी पूर्ण लिलाव होणार आहे, त्याचबरोबर ही लीग आठऐवजी नऊ संघांची असेल. त्यातील नववा संघ अहमदाबादचा असेल, असे संकेत मिळत आहेत. 

भारतीय मंडळाने २०२१ च्या लीगपूर्वी लिलाव करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. २०२० चा मोसम लांबल्याने लिलाव एक वर्ष लांबणीवर पडेल, अशी चर्चा होती. मात्र भारतीय मंडळाने हा लिलाव जानेवारीच्या उत्तरार्धात अथवा फेब्रुवारीच्या पूर्वार्धात होईल असे संकेत दिले आहेत. २०२१ ची लीग मार्चच्या अखेरच्या आठवड्यात सुरू करण्याचा भारतीय मंडळाचा विचार आहे. त्यामुळेच लिलाव फेब्रुवारीच्या पूर्वार्धापर्यंतच घेण्याचा विचार आहे. भारतीय मंडळाचे पदाधिकारीही लिलाव एका वर्षाने लांबवण्यास तयार होते. मात्र देशातील  कार्पोरेट जायंटस्‌ लीगमध्ये आणखी एक संघ उतरवण्यास उत्सुक आहेत. 

किती खेळाडू कायम ठेवणार?
नव्याने लिलाव होणार असला तरी रिटेंशनबाबत मतभेद आहेत. संघाची ओळख जपण्यासाठी किमान चार खेळाडू राखण्याची मुभा असावी, असा फ्रॅंचाईजचा आग्रह आहे. मात्र यास सर्व संघ तयार नाहीत, असे समजते. याचबरोबर राईट टू मॅच कार्डही असावे, अशीही 

संबंधित बातम्या