पाच महिन्याच्या ब्रेकनंतर सरावापूर्वी खूप धास्तावलो होतो: विराट कोहली

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

पाच महिन्यांनंतर बॅट उचलली होती. मैदानात उतरलो होतो. सराव सुरू होणार होता, पण त्यापूर्वी धास्तावलेलो होतो. मात्र तो अपेक्षेपेक्षा खूपच चांगला झाला. लॉकडाऊनमध्ये तंदुरुस्तीकडे लक्ष दिले होते. त्यामुळे तंदुरुस्त होतो. त्याचा फायदा झाला, असे कोहलीने सांगितले.

दुबई: पाच महिने बॅटला हात लावला नव्हता. त्यामुळे सरावापूर्वी काहीसा धास्तावलेला होतो, पण सराव अपेक्षेपेक्षा चांगला झाला, असे विराट कोहलीने सांगितले. आयपीएलसाठी अबुधाबीत सराव केल्यानंतर कोहलीने हे सांगितले. 

पाच महिन्यांनंतर बॅट उचलली होती. मैदानात उतरलो होतो. सराव सुरू होणार होता, पण त्यापूर्वी धास्तावलेलो होतो. मात्र तो अपेक्षेपेक्षा खूपच चांगला झाला. लॉकडाऊनमध्ये तंदुरुस्तीकडे लक्ष दिले होते. त्यामुळे तंदुरुस्त होतो. त्याचा फायदा झाला, असे कोहलीने सांगितले. तंदुरुस्त असल्यामुळे शरीर हलके वाटत होते, त्यामुळे हालचाली सहजपणे होत होत्या. त्यामुळे चेंडू खेळण्यास जास्त वेळ मिळत आहे, असे वाटत होते. खरं तर दीर्घ ब्रेकनंतर विशेषतः मोसमपूर्व सराव सुरू करताना शरीर जड असल्यासारखे वाटत राहते. त्याची हालचाल मंदावली असेही वाटते. ते सतत मनात येत राहते. मात्र यावेळी सराव खूपच चांगला झाला. 

कोहलीच्या सरावाची क्‍लीप पाहत असताना तो सहजपणे खेळत असल्याचे जाणवत होते. त्याने आखूड टप्प्याच्या चेंडूवर छान फटकेबाजी केली. 

कोहलीने संघाच्या गोलंदाजीच्या सरावाबाबतही टिपण्णी केली. तो म्हणाला, शाहबाज नदीम, वॉशिंग्टन सुंदर या फिरकी गोलंदाजांचा सरावाच्यावेळी टप्पा अचूक होता. चहलनेही चांगली गोलंदाजी केली. सीम गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली आहे. 

चेन्नई संघाबाबत भारतीय मंडळ धास्तावलेले
चेन्नई सुपर किंग्ज सुरुवातीचे सामने खेळू शकणार का, याची धास्ती भारतीय मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना वाटत आहे. सर्व काही सुरळीतपणे घडेल, अशी अपेक्षा गांगुली यांनी व्यक्त केले. आयपीएलच्या सुरळीत संयोजनासाठी सुरुवातीच्या वीस लढती दुबईत घेण्याचा विचार होत आहे. ज्याद्वारे अबुधाबीत असलेल्या संघांना कोलकता आणि मुंबई संघांनाच प्रवास करावा लागेल असा विचार होत आहे. दरम्यान, अमिरातीतील रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे अबुधाबी तसेच दुबई सीमेवरील चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या