टोक्यो ऑल्पिम्पिक होणारच जपानच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला निर्धार

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 30 जानेवारी 2021

जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत होणारच असा निर्धार व्यक्त केला आहे.

टोक्यो: जपानमध्ये कोरोनाचे सावट अद्याप तरी कमी होण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्य़ामुळे टोक्यो मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक आयोजनाच्या बाबतीत अनिश्चितता दिसू लागली आहे. मात्र जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत होणारच असा निर्धार व्यक्त केला आहे.‘’भविष्यात यासारख्या विषाणूचा प्रतिकार  करण्यासाठी आम्हाला धडा मिळाला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र यावर्षी कोणत्याही परिस्थितीत ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. कोरोनावर मानवी प्रयत्नातून विजय मिळवण्यासाठी सर्वार्थाने कटिबध्द आहोत. जगातील एकतेची ताकद तसेच लोकांमध्ये आशा आणि धैर्य निर्माण करण्यासाठी आम्ही ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करणार आहोत.'' असे पंतप्रधान सुगा सांगितले. जागतिक आर्थिक परिषदेत ते बोलत होते.

चर्चिल ब्रदर्सला ट्राऊ एफसी रोखले

पुढे ते म्हणाले, ‘’जपान कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडेल. देशातील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे सुरक्षितरित्या ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचा आम्ही निर्धार केला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारी पासून मोठा धडा घेतला आहे. भविष्यात कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत’’.  
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात याव्यात असे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी असा सल्ला दिला होता. मात्र जपानने या स्पर्धा पुढे ढकलण्यास नकार दिला होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक देशांनी आपले खेळाडू जपानला पाठवण्यास असमर्थता दर्शवली होती. आता आयओसीने 2021 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आता यावर्षी आम्ही ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन कोरोनाची योग्य ती खबरदारी घेवून करु असा निर्धार पंतप्रधानानी बोलून दाखवला आहे.

संबंधित बातम्या