पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं भारतीय क्रिकेटवर मोठं वक्तव्य

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय क्रिकेटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय क्रिकेटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेट संघाचा कर्णधार इम्रान खान यांचं असं मत आहे की, क्रिकेटसाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्यामुळे भारत जगातील सर्वोच्च संघांपैकी एक बनला आहे. इम्रान म्हणाले, “पाकिस्तान नेहमीच एक चांगला संघ होता परंतु क्रिकेटची रचना सुधारत नसल्यामुळे तो जागतिक वर्चस्व असणारा संघ होऊ शकला नाही.”

IND Vs ENG: धोनीच्या बालेकिल्ल्यात फोक्सने अशी करून दिली 'थाला'ची आठवण

इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलताना इम्रान म्हणाले, "आज भारताकडे पाहा, तो जगातील अव्वल संघ बनत आहेत कारण त्यांच्याकडे पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत, जरी कौशल्य हे आपल्याकडे अधिक आहे."

INDvsENG : सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या रिषभ पंतच्या नावावर झाला अनोखा विक्रम 

“एखादी रचना तयार करण्यासाठी आणि कलागुणांना वाव देण्यास वेळ लागतो, पण मला विश्वास आहे की आमचा संघही जगातील अव्वल संघ बनेल”, असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य संरक्षक इम्रान खान म्हणाले. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकांमुळे खेळायला जास्त वेळ मिळत नसल्याचंदेखील त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या