...म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान 'पृथ्वी शॉ'ला झाले अश्रू अनावर

...म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान 'पृथ्वी शॉ'ला झाले अश्रू अनावर
Prithvi Shaw could not stop himself from crying during Australia tour

नवी दिल्ली :  भारतीय युवा फलंदाज पृथ्वी शॉने विजय हजारे ट्रॉफी 2021 मध्ये 188.5 च्या सरासरीने 754 धावा केल्या आहेत. या मोसमातील या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी मुंबई व उत्तर प्रदेश यांच्यात खेळवला जाईल. ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील अॅडलेड कसोटी सामन्यात आधी 0 व नंतर 4 वर आऊट झाल्यामुळे त्याला पुन्हा संघात स्थान मिळाले नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतही त्याचा समावेश नव्हता.

अशा परिस्थितीत पृथ्वी शॉ मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांग्ल्या लयीत दिसला व त्याने शानदार खेळी करत धावाही चांगल्या केल्या. उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटकविरुद्ध त्याने 165 धावांनी केलेल्या खेळीमुळे मुंबईला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला.पृथ्वी शॉने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत ऑस्ट्रेलियन दौर्‍याबद्दल,  पृथ्वी शॉने सांगितले की, “जेव्हा मी ऑस्ट्रेलियन दौर्‍यावर वगळलो गेलो, तेव्हा मी गोंधळलो होतो. मी स्वतःला विचारत होतो काय होत आहे? माझ्या फलंदाजीत काही अडचण आहे का? काय चूक आहे? स्वत: ला शांत करण्यासाठी मी माझ्याशी बोललो. मी स्वत: ला सांगितले की सामन्यादरम्यान गुलाबी चेंडूने खेळण्यात सर्वोत्कृष्ट असलेल्या गोलंदाजांसमोर मी खेळत होतो,  तो पुढे म्हणाला, "मी आऊट का झालो, हा असा प्रश्न होता. मला मिशेल स्टार्कसने पहिल्या डावात आणि पॅट कमिन्सच्या दुसर्‍या डावात मला आऊट केलं.  मी आरश्यासमोर उभा राहून स्वत: ला सांगितलं की बरेच लोक म्हणत आहेत, तितका वाईट खेळाडू मी नाही. रवी शास्त्री सर आणि विक्रम राठोड सरांनी मला कुठे चुकले आहे याची जाणीव करून दिली. मला तोडगा काढायचा होता. फक्त नेटवर परत जाऊन मला माझी ही चूक सुधारायची होती. 

"जेव्हा मला वगळण्यात आले तेव्हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होता"

पृथ्वी शॉने सांगितले की पहिल्या कसोटीतील खराब कामगिरीनंतर मला वगळण्यात आले. मी खूप अस्वस्थ होतो. संघाने चांगले काम केले याचा मला आनंद असूनही मला असे वाटले की मी निराश आहे. मी स्वत: ला सांगितले की आता मला तयार करावे लागेल. मी स्वत: ला सांगितले की प्रतिभा ठीक आहे, परंतु मी अधिक कष्ट केले नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही. जेव्हा मला वगळण्यात आले तेव्हा ते माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होते. मी माझ्या खोलीत जाऊन खूप रडलो. मला वाटले की काहीतरी चूक होत आहे. मला लवकरच उत्तर शोधायचे होते.

पृथ्वी शॉने भारतात आल्यानंतर सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली

तो  पुढे म्हणाला, "मी कोणाशीही बोललो नाही. मला कॉल येत होते, परंतु मी लोकांशी बोलण्याच्या स्थितीत नव्हतो. माझ्या मनात बरेच काही चालले होते. भारतात आल्यानंतर सचिन तेंडुलकर सरांना भेटलो. त्यांनीमला सांगितलं की माझ्या खेळण्याच्या शैलीत 
फारसा बदल करण्याची गरज नाही. केवळ तू शरीराजवळून चेंडू खेळण्याचा प्रयत्न कर. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com