Professional League Football: पॅक्स ऑफ नागोवाचा सलग दुसरा विजय

कुठ्ठाळी व्हिलेजर्सवर 1-0 फरकाने निसटती मात केली
Professional League Football
Professional League FootballDainik Gomantak

पॅक्स ऑफ नागोवा संघाने गुरुवारी प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी कुठ्ठाळी व्हिलेजर्सवर 1-0 फरकाने निसटती मात केली.

सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. सामन्यातील निर्णायक ठरलेला गोल रॉयल ऑलिव्हेरा याने सामन्याच्या सहाव्या मिनिटास नोंदविला.

Professional League Football
37th National Sports Competition: उदघाटनापूर्वी होतील स्पर्धेतील सामने; 22 ऑक्टोबरपासून नेटबॉल स्पर्धा

जेस्लॉय मोनिझ याच्या शानदार पासवर त्याने कुठ्ठाळी व्हिलेजर्सच्या गोलरक्षकाला पूर्णपणे चकवा दिला. रॉयल सामन्याचा मानकरी ठरला.

स्पर्धेतील अगोदरच्या लढतीत वास्को स्पोर्टस क्लबला पराजित केलेल्या पॅक्स ऑफ नागोवाचे आता तीन लढतीनंतर दोन विजय व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे सहा गुण झाले आहेत. कुठ्ठाळी व्हिलेजर्सला ओळीने तिसरा पराभव पत्करावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com