हार न स्वीकारण्याचा दृष्टिकोन स्फूर्तिदायी ठरत आहे : डेव्हिड वॉर्नर

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

कोणत्याही परिस्थितीत हार न स्वीकारण्याची मानसिकताच आम्हाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून देणारी ठरली आहे, असे मत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केले.  

शारजा:  कोणत्याही परिस्थितीत हार न स्वीकारण्याची मानसिकताच आम्हाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून देणारी ठरली आहे, असे मत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केले.  

आयपीएल स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानी राहिलेल्या मुंबई इंडियन्सचा शेवटच्या साखळी सामन्यात १० विकेटने पराभव करून हैदराबादने आपली जिगर सिद्ध केली आहे. पंजाबविरुद्ध झालेल्या दारुण पराभवानंतर केलेली ही प्रगती सुखावणारी आहे. मुंबईने त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली तरीही आम्ही त्यांना १५० धावांपर्यंत रोखले हे फार मोठे यश होते. याचे श्रेय आमच्या सर्व गोलंदाजांना प्रामुख्याने शाहबाझ नदीमला जाते. त्यानंतर हे आव्हान सहज पार केले, त्यामुळे अधिक आनंद झाला असे वॉर्नरने सांगितले.
कोणत्याही परिस्थितीत हार स्वीकारायची नाही हाच दृष्टिकोन आम्ही प्रत्येक सामन्यात ठेवला. काही खेळाडूंना दुखापती झाल्या, परंतु कोठेही संघातली विजिगिषू वृत्ती कमी होऊ दिली नाही. मुंबईविरुद्धच्या सामन्यातून मिळालेला विश्‍वास पुढील सामन्यातही कायम राखू शकलो तर फारच आनंद होईल, असे 
वॉर्नरने सांगितले.
 

संबंधित बातम्या