पुदुचेरी समोर गोव्याच्या मुलींची सपशेल शरणागती
GCA LogoDainik Gomantak

पुदुचेरी समोर गोव्याच्या मुलींची सपशेल शरणागती

पुदुचेरीचा १३५ धावांनी दणदणीत विजय; अमृताच्या १९ धावांत ८ विकेट

पणजी: गोव्याच्या 19 वर्षांखालील मुलींची (Goa Women's Under19 Cricket) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी रविवारीही कायम राहिली. एलिट ब गट लढतीत त्यांनी पुदुचेरीविरुद्ध सपशेल शरणागती पत्करली त्यामुळे 135 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला.

नागपूर येथील लेडी अमृतबाई डागा कॉलेज मैदानावर सामना झाला. पुदुचेरीच्या अमृती सरण हिने अवघ्या 19 धावांत 8 विकेट टिपल्या. त्यामुळे गोव्याचा डाव 98 धावांतच आटोपला. गोव्याच्या डावात अवांतर 30 धावा सर्वाधिक ठरल्या. फक्त कर्णधार इब्तिसाम शेख (15) व मेताली गवंडर (13) यांनीच दुहेरी धावसंख्या गाठली.

GCA Logo
खेळाडूंसाठी अमेय ठरलाय ‘शक्तिवर्धक’

गोव्याने नाणेफेक जिंकून पुदुचेरीस प्रथम फलंदाजीस पाचारण केले. पहिल्याच चेंडूवर विकेट गमावल्यानंतर नाबाद शतकवीर आर. रोशनी (106, 152 चेंडू, 16 चौकार) व कर्णधार युवाश्री (72, 104 चेंडू, 11 चौकार) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. त्यामुळे पुदुचेरीस निर्धारित 50 षटकांत 3 बाद 233 धावा करणे शक्य झाले.

गोव्याचा हा चार लढतीतील तिसरा पराभव ठरला. एक लढत पावसामुळे रद्द झाल्यामुळे दोन गुणांसह गोव्याचा संघ गटात तळात आहे. पुदुचेरीचा हा चार लढतीतील दुसरा विजय असून त्यांचे 10 गुण झाले आहेत.

Related Stories

No stories found.