पुण्यातील गिरिजा शंकर मुनगली फुटबॉलच्या स्टार्क फोर्समध्ये

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

मुनलगी हे सध्या भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या क्‍लब लायसनिंग समितीचे अध्यक्ष आहेत. आता स्टार्क फोर्समध्ये नियुक्त करण्यात आलेल्या सात जणांच्या समितीत ते एकमेव भारतीय आहेत.

पुणे: आशिया आणि ऑस्ट्रेलियातील फुटबॉल क्‍लबमध्ये नियमितता ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आशियाई फुटबॉल कॉन्फडरेशनच्या टास्क फोर्समध्ये पुणे स्थित निवृत्त कर्नल डॉ. गिरिजा शंकर मुनगली यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुनलगी हे सध्या भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या क्‍लब लायसनिंग समितीचे अध्यक्ष आहेत. आता स्टार्क फोर्समध्ये नियुक्त करण्यात आलेल्या सात जणांच्या समितीत ते एकमेव भारतीय आहेत.

आशियाई फुटबॉल कॉन्फडरेशनकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुनगली हे आपल्या अनुभवाचा उपयोग करून देशातील विशेषतः ग्रामीण भागातून नवोदित फुटबॉल खेळाडूंसाठी प्रोत्साहन आणि संधी तयार करणार आहेत. 

डॉ. मुनगली हे टास्क फोर्सच्या समितीवर २०२३ पर्यंत असतील. त्यांची नियुक्ती आशिया फुटबॉल कॉन्फडरेनशचे सरचिटणीस दॅतो विन्डसोर जॉन यांनी नुकतीच जाहीर केली.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या