कलाटणी देणाऱ्या विजयासह पंजाबचे आव्हान कायम

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

गोदर मुंबई आणि त्यानंतर दिल्ली या अव्वल संघांना पराभवाचा धक्का देत आशा उंचावणाऱ्या पंजाबने आज हैदराबादला हरवून आयपीएलमधील प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या.

दुबई: अगोदर मुंबई आणि त्यानंतर दिल्ली या अव्वल संघांना पराभवाचा धक्का देत आशा उंचावणाऱ्या पंजाबने आज हैदराबादला हरवून आयपीएलमधील प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या. दुसरीकडे विजयाची संधी हातची गमावणाऱ्या हैदराबादच्या परतीचा प्रवास सुरू झाला. 
अवघ्या १२६ धावा पंजाबने डेव्हिड वॉर्नर आणि बेअरस्टॉ यांनी ५६ धावांची सलामी देऊनही निर्णायक ठरवल्या. मधली फळी एकदमच कमकूवत असल्याचा फटका हैदराबादला बसला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात जॉर्डनने सलग दोन चेंडूत दोन विकेट मिळवून सामना पंजाबच्या बाजूने झुकवला. 

पंजाबच्या फलंदाजांकडूनही निराशा 
पहिल्या सात षटकात ५६ धावा केलेल्या पंजाबला पुढच्या तेरा षटकात ७० धावा करता आल्या, त्याही सहा विकेट गमावत. या टप्प्यात ते केवळ दोन चौकार मारु शकले. गेल आणि राहुलला दोन चेंडूत बाद केल्यावर हैदराबादने पंजाबवरील पकड जास्तच घट्ट करत नेली. गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीचा हैदराबादच्या सर्वच गोलंदाजांनी फायदा घेतला. 
मयांक अगरवालविना खेळत असल्यामुळे राहुल आणि गेल जरा जास्तच सावध होते. ते परतल्यावर धावगती उंचावण्याच्या जणू आशाही संपल्या. पंजाबचा डाव पुन्हा पूरनने सावरला. 
 

संबंधित बातम्या