IPL 2021 PBKS vs CSK: आज चेन्नई विरुद्ध पंजाब सामना; काय असेल प्लेयिंग-11

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

आज सायंकाळी सात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई येथे पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे

आज सायंकाळी सात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई येथे पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. आपल्या पहिल्या विजयासह  हंगामाची सुरूवात करणारे पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आपली विजयाची मालिका सुरु ठेवतील की चेन्नई आपल्या विजयाचा श्रीगणेशा करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. चेन्नईची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याच्या संघातील अनेक वृद्ध आहेत, ज्यांनी अलीकडच्या काळात जास्त क्रिकेट खेळलेले नाही. चेन्नईच्या अव्वल फळीतील फलंदाजांना चांगली सुरुवात करावी लागेल. (Punjab match against Chennai today; What will be playing-11)

IPL 2021: आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अस काहीतरी घडलं

मागच्या सामन्यात अखेर सॅम कराणने 15 चेंडूंत 34 धावा केल्या आणि संघाला मजबूत स्थितीतमध्ये नेले होते. तसेच पंजाब किंग्जच्या दीपक हूडाने  संघासाठी अखेरच्या सामन्यात 28 बाद 64 धावा केल्या होत्या. तथापि, चेन्नईविरुद्ध हुड्डा व्यतिरिक्त केएल राहुल, ख्रिस गेल, निकोलस पूरन आणि शाहरुख या फलंदाजांनाही चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच धोनी ब्रिगेडला गोलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागेल.

पीच रिपोर्ट 
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. तसेच काल झालेल्या सामन्यात चेंडू थांबून येत असल्याने गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. पंजाब आणि राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात 400 च्या वर धावा झाल्या होत्या. पंजाबच्या संघ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चेन्नईच्या एक पाऊल पुढे आहे. 

BCCI ने केले खेळाडूंसोबत करार; हे ३ खेळाडू आहेत ए+ श्रेणीत

पंजाब किंग्जचा संभाव्य संघ 
केएल राहुल (कप्तान आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, दीपक हूडा, निकोलस पूरन, शाहरुख खान, झय रिचर्डसन, मुरुगन अश्विन, रिले मेरिथ, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी. 
चेन्नई सुपर किंग्जचा संभाव्य संघ  
ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कप्तान आणि विकेटकीपर), सॅम करण, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, दीपक चहर.

संबंधित बातम्या