अचानक फॉर्मात आलेल्या पंजाबची आज कोलकात्यासमोर कसोटी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

प्लेऑफसाठी चौथ्या संघासाठी चुरस निर्माण झाली आहे. यात पंजाबसह कोलकाता यांच्यात शर्यत आहे आणि याच दोन संघांत आज सामना होणार असल्याने दोघांसाठी अतिशय महत्त्वाची लढत असणार आहे. 

शारजा- सुरुवातीच्या काळात हातातोंडाशी आलेले विजय थोडक्‍यात गमावणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबला आता विजयाची सवय झाली. सलग चौथा विजय आणि आयपीएलच्या प्लेऑफसाठी प्रबळ दावेवारी अशा टप्प्यावर ते आले आहेत; मात्र उद्या ताकदवर कोलकाता नाईटरायडर्सलाही पराभूत करण्याचा पराक्रम त्यांना करावा लागणार आहे.

आयपीएल अंतिम टप्प्यात आली आहे. प्लेऑफसाठी चौथ्या संघासाठी चुरस निर्माण झाली आहे. यात पंजाबसह कोलकाता यांच्यात शर्यत आहे आणि याच दोन संघांत आज सामना होणार असल्याने दोघांसाठी अतिशय महत्त्वाची लढत असणार आहे. 

उद्या पंजाबने विजय मिळवला, तर त्यांना कोलकाताच्या १४ गुणांशी बरोबरी करता येईल आणि जर पराभव झाला, तर दोघांमधले अंतर चार गुणांनी वाढेल. त्यामुळे पंजाबला उद्या विजय आवश्‍यकच आहे. सलग तीन विजयांमुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढलेला आहे. कोलकाताही बंगळूरविरुद्धच्या मानहानीकारक पराभवामुळे सावरले आहे.

 ख्रिस गेल संघात आला आणि पंजाबचे दैव बदलले. गेल्या तिन्ही विजयात योगदान देत गेलने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. उद्या कोलकाताविरुद्धही त्याची बॅट तळपावी, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या