निव्वळ योगायोग ! क्रिकेट स्टेडियमध्ये मोदी,अंबानी आणि अदानी आले एकत्र

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

स्टेडियममधील बॉलिंग एडला गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांची नावे देण्यात आल्यामुळे नेटीझन्संनी समाजमाध्य़मावरुन भाजपवर हल्लाबोल सुरु केला आहे.

अहमदाबाद: जगातील सर्वात मोठे स्टेडियम म्हणून नावलौकिक असणारे अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव दिल्यानंतर भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात शाब्दीक हल्लाबोल सुरु झाला. पूर्वी या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव होते. ते बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद’ असे नाव देण्य़ात आले. या स्टेडियमचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. नरेंद्र मोदी स्टेडियमभोवती एनक्लेव्ह उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये अन्य क्रिडाप्रकारांची सुवीधाही करण्यात आली आहे. स्टेडियममधील बॉलिंग एडला गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांची नावे देण्यात आल्यामुळे नेटीझन्संनी समाजमाध्य़मावरुन भाजपवर हल्लाबोल सुरु केला आहे.

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव

या स्टेडियमच्या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, बीसीसीआयचे सचिव जय शहा, केंद्रीय क्रिडामंत्री किरण रिजीजू उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुजरात क्रिकेट असोसिएसनचे अध्यक्ष राहिले आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादला जगातील सर्वात मोठे स्टेडियम बनवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या उद्घाटन समारोहानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात झाली. अहमदाबादमध्ये सरदार वल्लभभाई पटेल क्रिडा संकुल उभारण्यात येणार असून स्टेडियम हा त्याचा भाग आहे.

दरम्यान नरेंद्र मोदींचे या स्टेडियमला नाव दिल्यानंतर समाजमाध्यमात युध्द छेडलं गेलं. भाजपकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले तर दुसरीकडे नेटिझन्सकडून भाजपवर टिका करण्यात येत आहे.

      

 

संबंधित बातम्या