पुरुम चुंबांग ते गोवा व्हाया पंजाब

पुरुम चुंबांग ते गोवा व्हाया पंजाब
Makan Winkle

पणजी

मणिपूरमधील पुरुम चुंबांग ते गोवा व्हाया पंजाब हा वीस वर्षीय प्रतिभाशाली फुटबॉलपटू माकन विंकल चोथे याचा प्रवास स्पृहणीय आहे. अवघ्या तीन वर्षांत इंडियन सुपर लीग (आयएसएल) संघाकडून करार मिळविण्यापर्यंत स्वप्नवत पल्ला गाठला आहे.

एफसी गोवा संघाने या गुणवान विंगरला २०२३ पर्यंत करारबद्ध केले आहे. शालेय शिक्षणानंतर पंजाबमधील मिनर्व्हा अकादमीत चाचणीद्वारे स्थान मिळविलेल्या या फुटबॉलपटूने साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.

‘‘मी आश्चर्यचकित आहेतुम्ही हर्षभरीत म्हणू शकता. एफसी गोवा माझ्याशी करार करू इच्छित असल्याचे मी कोणालाच सांगितले नव्हतेपालकांना सुद्धा नाही. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करताना त्यांना माहिती दिलीमी आनंदित आहे,’’ असे माकन याने एफसी गोवाच्या करारविषयी सांगितले.

२०१७ पासून माकन चोथे याने आपल्या चपळ खेळाने भारतीय फुटबॉल विश्वाला दखल घेण्यास भाग पाडले आहे. तीन वर्षांपूर्वी पंजाबमधील मिनर्व्हा अकादमीत त्याची निवड झालीत्यानंतर या मणिपुरी खेळाडूने मागे वळून पाहिलेच नाही. एलिट यूथ लिग विजेतेपदआय-लीग स्पर्धेत गोलएएफसी कप स्पर्धेत खेळण्याची संधी अशी मजल गाठत गेला. जगप्रसिद्ध पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा तो चाहता आहे.

 नैसर्गिक गुणवत्तेस धुमारे

माकनच्या फुटबॉलची सुरवात शास्त्रोक्त प्रशिक्षणाने झालेली नाही. तो सांगतो, ‘‘मणिपूरमधील आमच्या गावी पुरुम चुंबांग येथे शाळा सुटल्यानंतर आणि सुट्टीत मी खेळत असेल. हा खेळ माझ्यासाठी नैसर्गिक आहे.’’ दहावीची परीक्षा दिल्यानंतर तो पश्चिम बंगालमधील सिलिगुडी आला. तेथे कांचनजुंगा एफसी या संघात दाखल झाला. त्याच कालावधीत त्याला फेसबुकच्या माध्यमातून मिनर्व्हा अकादमीच्या चाचणीविषयी समजले. ‘‘त्या चाचणीसाठी मला पंजाबमध्ये नेण्यासाठी मी काकांना पटवून दिले. माझ्या क्षमतेवर माझा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मला चाचणी हवी होती,’’ असे मागे वळून पाहताना माकन म्हणाला.

 फुटबॉलपटू माकन विंकल चोथे याच्याविषयी...

२०१७ साली पंजाबमधील मिनर्व्हा अकादमीत निवड

पहिल्याच मोसमात १३ सामन्यात ३५ गोल

२०१७-१८ मोसमात मिनर्व्हा अकादमीच्या एलिट यूथ लीग विजेतेपदात प्रमुख वाटा

मिनर्व्हा पंजाब एफसी संघातून २०१७-१८ मोसमात आय-लीगमध्ये पदार्पण

२०१८-१९ मोसमात आय-लीगमध्ये ११ सामनेएएफसी कप स्पर्धेत सहभाग

२०१९-२० मोसमातील आय-लीगमध्ये १४ सामने २ गोल१ असिस्ट

संपादन- अवित बगळे

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com