जगज्जेत्या सिंधूचा सराव आठ दिवसांतच स्थगित

.
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

सिक्की रेड्डी, फिजिओंना कोरोनाची बाधा

मुंबई: जगज्जेत्या पी. व्ही. सिंधूप्रमाणेच गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत सराव सुरू केलेली एन. सिक्की रेड्डी तसेच अकादमीतील फिजिओंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी सुरू झालेला सराव तातडीने स्थगित करण्याचा निर्णय झाला आहे. 

मार्च महिन्यांतील ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पराजित झाल्यानंतर पाच महिन्यांनी सिंधू हैदराबाद येथील गोपीचंद अकादमीच्या कोर्टवर सरावासाठी उतरली होती. सात ऑगस्टला तिने सरावास सुरुवात केली होती; मात्र आता याच अकादमीत सराव करणारी सिक्की तसेच फिझिओ किरण सी. यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे शिबिर स्थगित ठेवण्याचा निर्णय झाला आहे. 

सिक्की रेड्डी तसेच किरण हे हैदराबादलाच राहतात. ते रोजच्या सरावासाठी घरूनच येत होते. या शिबिरात असलेल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सिक्की तसेच किरणला कोरोनाची बाधा असल्याचे आढळले. दोघांत कोणतीही कोरोनाची लक्षणे दिसली नव्हती. आता सिक्की तसेच किरण यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची नव्याने चाचणी घेण्यात येणार आहे. दरम्यान, संपूर्ण अकादमी आता निर्जंतुक करण्यात येणार आहे. 

पुल्लेला गोपीचंद यांनी शिबिरातील प्रत्येकाची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात दोघांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळले. 

संबंधित बातम्या