IND vs AUS: वॉर्नर बनला अश्विनचा बनी! भारतीय फिरकीपटूच्या नावावर 3 खास विक्रमांचीही नोंद

आर अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत एकूण 8 विकेट्स घेत मोठे विक्रम नावावर केले आहेत.
R Ashwin
R AshwinDainik Gomantak

R Ashwin: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेचा पहिला सामना शनिवारी संपला. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याने काही विक्रमही नावावर केले आहेत.

वॉर्नर अश्विनचा बनी

अश्विनने या सामन्याच्या पहिल्या डावात 42 धावांत 3 विकेट्स आणि दुसऱ्या डावात 37 धावांत 5 विकेट्स अशा मिळून एकूण 8 विकेट्स घेतल्या. दरम्यान, अश्विनने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा घातक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरलाही बाद केले.

अश्विनने वॉर्नरला कसोटीत बाद करण्याची ही 11 वी वेळ आहे. त्यामुळे अश्विनविरुद्ध कसोटीत सर्वाधिकवेळा बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये वॉर्नर बेन स्टोक्ससह अव्वल स्थानी आला आहे. स्टोक्सलाही अश्विनने 11 वेळा बाद केले आहे. तसेच यानंतर ऍलिस्टर कूक असून त्याला अश्विनने 9 वेळा बाद केले आहे, तर टॉम लॅथमला 8 वेळा बाद केले आहे.

R Ashwin
R Ashwin @450: अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा! कॅरीची विकेट घेत रचला इतिहास

अश्विनने दिग्गजांना टाकलं मागे

भारतीय संघाने विजय मिळवलेल्या कसोटी सामन्यांमध्ये अश्विनने एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी 26 वेळा केली आहे. त्यामुळे तो विजयी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिकवेळी एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

त्याने ही कामगिरी करताना रंगना हेरथ, डेल स्टेन, जेम्स अँडरसन अशा गोलंदाजांना मागे टाकले आहे. या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन आहे. मुरलीधरनने 41 वेळा असा कारनामा केला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर शेन वॉर्न आहे. वॉर्नने ऑस्ट्रेलियाने विजय मिळवलेल्या कसोटी सामन्यांमध्ये 27 वेळा 5 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

विजयी कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिकवेळा एका डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स

41 - मुथय्या मुरलीधरन

27 - शेन वॉर्न

26 - आर अश्विन

25 - रंगना हेरथ

22 - डेल स्टेन

21- जेम्स अँडरसन

20 - अनिल कुंबळे

R Ashwin
IND vs AUS, 1st Test: टीम इंडियाचा डावाने दणदणीत विजय, अश्विन-जडेजाच्या फिरकीने कांगारुंना गुंडाळलं

याशिवाय अश्विनने 31 वेळा कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यातील 25 वेळा त्याने भारतात खेळताना एका कसोटी डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान कसोटीत सर्वाधिकवेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळे अव्वल क्रमांकावर आहे. कुंबळेने 35 वेळा एका कसोटी डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे कुंबळेनेही भारतात 25 वेळाच एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

सर्वाधिकवेळा एका कसोटी डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज -

35 - अनिल कुंबळे

31 - आर अश्विन

25 - हरभजन सिंग

23 - कपिल देव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com