राहणे, पुजारा यांनी केली विराटची तक्रार?, BCCIच्या मते सर्व बातम्या खोट्या

बोर्डाच्या (BCCI) वतीने मी याबाबत तुम्हाला हे सांगणार आहे. मला असे म्हणायचे आहे की, विराट (Virat Kohli) विरोधात अशी कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यात आलेली नाही. असे बोर्डाचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी स्पष्ट केले.
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी विराट कोहलीच्या ड्रेसिंग रूममधील वर्तनाबाबत आणि त्याच्या कर्णधारपदाबद्दल बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांच्याकडे तक्रार केली.
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी विराट कोहलीच्या ड्रेसिंग रूममधील वर्तनाबाबत आणि त्याच्या कर्णधारपदाबद्दल बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांच्याकडे तक्रार केली. Dainik Gomantak

टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टी -20 फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयाबाबत एक नवा कोन समोर आला आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी विराट कोहलीच्या ड्रेसिंग रूममधील वर्तनाबाबत आणि त्याच्या कर्णधारपदाबद्दल बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयने संघातील इतर खेळाडूंकडून अभिप्राय मागितला आणि दौरा संपल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी विराट कोहलीच्या ड्रेसिंग रूममधील वर्तनाबाबत आणि त्याच्या कर्णधारपदाबद्दल बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांच्याकडे तक्रार केली.
विराटने T-20 मध्ये कर्णधारपद सोडण्याचे काय कारण...

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका बातमीनुसार, बीसीसीआयला (BCCI) ड्रेसिंग रूमच्या आत सुरू असलेल्या हालचालींची माहिती मिळाली होती. तसेच कोहलीच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्याच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला. त्याचबरोबर खेळाडूंशी त्याचे संबंधही बिघडत होते.

साऊथॅम्प्टन येथे झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर एका वरिष्ठ भारतीय खेळाडूने बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे विराट कोहलीबद्दल तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता त्याबाबत आलेल्या एका अहवालातही याची पुष्टी झाली आहे.

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी विराट कोहलीच्या ड्रेसिंग रूममधील वर्तनाबाबत आणि त्याच्या कर्णधारपदाबद्दल बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांच्याकडे तक्रार केली.
अश्विनच्या तक्रारीने विराटचे कर्णधारपद आले धोक्यात?

कोहली नियंत्रण गमावत असून, त्याने आदर गमावला आहे. काही खेळाडूंना त्याची वृत्ती आवडत नाही. तो यापुढे प्रेरणादायी कर्णधार राहिलेला नसून, तो खेळाडूंचा सन्मान मिळवू शकत नाही. त्याच्याशी व्यवहार करताना तो त्याच्या मर्यादा ओलांडत आहे. 'कोहली मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. अलीकडेच एका प्रशिक्षकाने विराटला नेटमध्ये सरावा दरम्यान काही सूचना दिल्या पण त्याने 'मला गोंधळात टाकू नका' असे उत्तर दिले. तो काही गोष्टी हाताळण्यात अपयशी ठरला आहे हे त्याच्या आक्रमक वागण्यातून दिसून येते.

माध्यमांमध्ये येणाऱ्या या सर्व बातम्या खोट्या

दरम्यान, आताच हाती आलेल्या बातमीनुसार, टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंनी कोहलीविरोधात बीसीसीआयकडे तक्रार केली होती. बोर्डाचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी या प्रकरणावर निवेदन दिले आहे. धुमल म्हणाले, "प्रसारमाध्यमांनी अशा बकवास गोष्टी लिहिणे बंद केले पाहिजे. मी ही गोष्ट सांगतो की प्रत्येक गोष्ट रेकॉर्डवर आहेत. कोणत्याही क्रिकेटपटूने BCCI ला लेखी किंवा तोंडी संपर्क साधला नसून असे काही प्रकार घडलेले नाहीत. अशा सर्व खोट्या अहवालांबद्दल बीसीसीआय उत्तर देऊ शकत नाही. मी असाच अहवाल दुसऱ्या दिवशी पाहिला की टी -20 विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ बदलला जाऊ शकतो. शेवटी असे कोणी म्हटले?

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी विराट कोहलीच्या ड्रेसिंग रूममधील वर्तनाबाबत आणि त्याच्या कर्णधारपदाबद्दल बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांच्याकडे तक्रार केली.
कर्णधारपदावरुन अखेर विराट पायउतार

ते पुढे म्हणाले, टी -20 विश्वचषकानंतर विराट कोहलीने या फॉरमॅटचे कर्णधारपद सोडल्याबद्दलची, विराटने स्वतःच घोषणा केली आहे. त्याला त्याच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याला जे करायचे आवडते ते तो करतो. त्याला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जायचे आहे. कर्णधारपद सोडण्याचा त्याचा निर्णय होता.

मला माध्यमांनी विचारले की, बीसीसीआयने कोहलीबाबत काही निर्णय घेतला आहे का, मी यावर असे म्हटले नाही जे पूर्णपणे बरोबर आहे. बीसीसीआयने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यावर कधीतरी चर्चा झाली नाही. हा निर्णय विराटनेचा स्वतःचा निर्णय असून, तो बीसीसीआयकडे त्याने पाठविला. खेळाडूंनी त्याच्याविरोधात बीसीसीआयकडे तक्रार केली आहे. अशा बातम्या माध्यमात प्रसिध्द होत झाल्या आहेत. त्यामुळे बोर्डाच्या वतीने मी याबाबत तुम्हाला हे सांगणार आहे. मला असे म्हणायचे आहे की, विराट विरोधात अशी कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यात आलेली नाही. असे बोर्डाचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com