IND vs NZ: मलिकेत चांगला विजय मिळाला असला तरी पाय जमिनीवर ठेवावे लागतील

प्रशिक्षक राहुल द्रविडचा (Rahul Dravid) भारतीय खेळाडूंना सल्ला,संघातील युवा खेळाडूंच्या कामगिरीने द्रविड खूश आहे.
IND vs NZ: मलिकेत चांगला विजय मिळाला असला तरी पाय जमिनीवर ठेवावे लागतील
युवा खेळाडूंच्या कामगिरीने Rahul Dravid खूश. Dainik Gomantak

कोलकता: भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) आपल्या नवीन भूमिकेची दमदार सुरुवात झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. परंतु खेळाडूंना आत्मसंतुष्टता टाळण्याचा सल्लाही त्याने यावेळी दिला. भारताने (India) रविवारी तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडवर (New Zealand) 73 धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत आपले वर्चस्व राखले. या सामन्यानंतर द्रविड म्हणाला, 'ही खरोखरच चांगली मालिका होती. मालिकेच्या सुरुवातीपासूनच सर्वांनी चांगले योगदान दिले. सुरुवात चांगली झाली आहे. पण आम्ही वास्तववादी असून, पाय जमिनीवर ठेवण्याची गरज आहे.

 युवा खेळाडूंच्या कामगिरीने Rahul Dravid खूश.
IND vs NZ: टीम इंडियाकडून T20 मालिकेत किवींना पुन्हा एकदा 'क्लीन स्वीप'

ते म्हणाले, ‘‘विश्वचषकानंतर सहा दिवसांत तीन सामने खेळणे न्यूझीलंडसाठी सोपे नव्हते. आम्हाला आमचे पाय जमिनीवर ठेवावे लागतील आणि पुढे जावे लागेल." संघात अनेक पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या युवा खेळाडूंच्या कामगिरीने द्रविड खूश आहे.‘‘काही युवा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली हे पाहून खरोखरच आनंद झाला. ज्या खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांत फारसे क्रिकेट खेळले नव्हते त्यांना आम्ही संधी दिली. आमच्याकडे चांगले पर्याय आहेत हे पाहून खरोखर आनंद झाला. असे त्याने स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com