म्हणून राहुल द्रविड संघात परतणार असल्याच्या चर्चा सुरु...

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 मे 2021

टिम इंडियाची अभेद्य द वॉल अर्थात राहुल द्रविड(Rahul Dravid) पुन्हा एकदा भारतीय संघाचा(Team India) भाग होण्याची शक्यता आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांची निवड होण्याची चिन्हं आहेत.

मुंबई : टिम इंडियाची अभेद्य द वॉल अर्थात राहुल द्रविड(Rahul Dravid) पुन्हा एकदा भारतीय संघाचा(Team India) भाग होण्याची शक्यता आहे. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांची निवड होण्याची चिन्हं आहेत. ते सध्या बेंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीचे प्रमुख आहेत.(Rahul Dravid to be part of Indian team again)

याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. द्रविड यांच्याशिवाय श्रीलंका दौऱ्यासाठी प्रशिक्षक म्हणून संजय बांगर, प्रवीण अमरे, डब्ल्यू.एस.रमण यांची नावंही चर्चेत आहेत. तर गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पारस म्हांब्रे यांचं नाव चर्चेत आहे.

ISL: एफसी गोवा संघात दाखल झाल्यानंतर कारकीर्द बहरली

मुख्य भारतीय संघ आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सिरीजसाठी जुलैमध्ये इंग्लंडला रवाना होणार आहेत. सर्व प्रमुख खेळाडू या संघाचा भाग असणार आहेत. याच काळात पर्यायी भारतीय संघ वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेला रवाना होणार आहे. या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे.

Mallakhamba: भारताच्या पांरपारिक खेळाचा जग्गजेत्ता अमेरिकेत ठरणार 

द्रविड यांची प्रशिक्षक पदी निवड झाल्यास ही त्यांची दुसरी वेळ असणार आहे. याआधी त्यांनी भारतीय U19 संघ तसंच भारतीय अ संघाचं प्रशिक्षकपद सांभाळलं आहे. यामध्ये U19 च्या संघानं वर्ल्डकप जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला आहे.

संबंधित बातम्या