टीम इंडियाला अखेर द्रविडच्या रुपात मिळाला 'कोच'

द्रविडने (Rahul Dravid) 2023 च्या विश्वचषकापर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षकपद भूषवण्याचे मान्य केले आहे.
Rahul Dravid
Rahul DravidDainik Gomantak

भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) नवीन प्रशिक्षकाचा शोध अखेर संपला आहे. टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ या महिन्यात सुरु होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) संपत आहे. या स्पर्धेनंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देतील. बीसीसीआयने माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी दिली आहे. द्रविडने 2023 च्या विश्वचषकापर्यंत टीम इंडियाचे प्रशिक्षकपद भूषवण्याचे मान्य केले आहे.

पीटीआयशी बोलताना बीसीसीआयचे अधिकारी म्हणाले, "होय, राहुल द्रविडने 2023 विश्वचषकापर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होण्यास सहमती दर्शवली आहे. सुरुवातीला ते यास सहमत नव्हते परंतु बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी राहुल यांची भेट घेतली अन् त्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपद स्वीकारण्यास राजी झाले." टीम इंडियाचे प्रशिक्षक बनण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, जेव्हा एक भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता, तेव्हा दुसरा संघ श्रीलंकेत होता. या दौऱ्यात भारतीय संघाने टी -20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली. येथे राहुलने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले.

Rahul Dravid
T20 World cup: आयसीसीने पहिल्यांदाच 'या' नियमाला दिला ग्रीन सिग्नल!

माजी भारतीय कर्णधाराने इंडिया ए टीम आणि 19 वर्षांखालील संघांचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. त्यांच्या देखरेखीखाली इंडिया ए टीमने परदेशी भूमीवर यश मिळवले होते. आणि 19 वर्षांखालील संघाने विश्वचषकाचे विजेतेपदही पटकावले होते. द्रविडने अनेक नवोदित खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान मिळवून देेण्यासाठी प्रयत्न केले. ऋषभ पंत, आवेश खान पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी आणि शुभमन गिल यांच्याशिवाय अनेक खेळाडूंना भारतीय संघात स्थानही मिळाले. टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक शास्त्री यांनी आधीच जाहीर केले होते की, टी -20 वर्ल्डकपनंतर आपण प्रशिक्षक पदाचा राजीनामा देणार आहोत. ते पुढे म्हणाले की, प्रशिक्षक म्हणून मला जे काही साध्य करायचे होते ते मी साध्य केले आहे. संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्यातील करारही वाढवण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com