न्यूझीलंड मालिकेसाठी टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबादारी राहुल द्रविडकडेच?

बीसीसीआयने (BCCI) माजी अनुभवी फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्याशी संपर्क साधला आहे. मात्र, 48 वर्षीय द्रविड न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यासाठी राष्ट्रीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक असणार आहेत.
न्यूझीलंड मालिकेसाठी टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबादारी राहुल द्रविडकडेच?
न्यूझीलंडच्या (New Zealand) भारत दौऱ्यादरम्यान BCCI राहुल द्रविड यांना भारतीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवू शकते. Dainik Gomantak

टीम इंडियाचे (Team India) मुख्य प्रशिक्षक (Head coach) पदासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. न्यूझीलंडच्या (New Zealand) भारत दौऱ्यादरम्यान BCCI राहुल द्रविड यांना भारतीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवू शकते. यूएईमध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर (T20 World Cup), भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडशी सामना करणार आहे. किवी संघ नोव्हेंबरमध्ये भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ते टीम इंडियासोबत 3 सामन्यांची टी 20 मालिका आणि 2 कसोटी सामने खेळणार आहेत.

न्यूझीलंडच्या (New Zealand) भारत दौऱ्यादरम्यान BCCI राहुल द्रविड यांना भारतीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवू शकते.
भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या रेसमधून राहुल द्रविड बाहेर

एका ऑस्ट्रेलियन खेळाडूला टीम इंडियाला पुढील प्रशिक्षक व्हायचे आहे. पण त्यात बीसीसीआयला स्वारस्य दिसत नाही. बीसीसीआयने राहुलला पूर्णवेळ प्रशिक्षक होण्यास सांगितले होते, पण राहुलने त्याला नकार देत, मला अपेक्षे पेक्षा जास्त प्रवास करायचा नाही. तसेच मला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतच काम करायचे आहे. असे राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले होते.

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी टी -20 विश्वचषकानंतर आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा संपूर्ण कोचिंग स्टाफ रवी शास्त्रीसोबत पदावरु पायउतार होणार आहे.

न्यूझीलंडच्या (New Zealand) भारत दौऱ्यादरम्यान BCCI राहुल द्रविड यांना भारतीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक बनवू शकते.
माजी खेळाडूंच्या ज्ञानाचा वापर संघ उभारणीसाठी करा: राहुल द्रविड

शास्त्रींच्या जाण्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपद रिक्त होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने माजी अनुभवी फलंदाज राहुल द्रविड यांच्याशी संपर्क साधला आहे. मात्र, 48 वर्षीय द्रविड न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यासाठी राष्ट्रीय संघाचे अंतरिम प्रशिक्षक असणार आहेत.

भारतीय संघाच्या सध्याच्या तरुण खेळाडूंना तयार करण्याचे काम राहुल द्रविड करीत आहे. 2016 ते 2019 पर्यंत ते इंडिया अ आणि 19 वर्षांखालील संघांचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांनी या काळात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आणि त्यांच्या प्रतिभेला जोपासले आहे.

Related Stories

No stories found.