आयपीयल 2020: जब व्हिलन 'हिरो' होता है....

मयुर बोरसे
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

चेोकार,षटकारांशी अक्षरश: आतषबाजी झालेल्या या सामन्यात अनेक विक्रम मोडले गेले. पहिल्यांदा विक्रमी धावांचा पाठलाग करताना एका संघाला विजेतेपद मिळाले. अतिशय अतितटीच्या झालेल्या या सामन्यात राजस्थानने पंजाबवर  रोमहर्षक विजय मिळवला.

शारजाह- आयपीयलतच्या १३ वर्षांच्या इतिहासात जे घडले नाही ते कालच्या राज्यस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेवन पंजाबच्या सामन्यात घडले. प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटतील असा हा सामना झाला. काय काय नाही घडलं यात ? चेोकार,षटकारांशी अक्षरश: आतषबाजी झालेल्या या सामन्यात अनेक विक्रम मोडले गेले. पहिल्यांदा विक्रमी धावांचा पाठलाग करताना एका संघाला विजेतेपद मिळाले. अतिशय अतितटीच्या झालेल्या या सामन्यात राजस्थानने पंजाबवर  रोमहर्षक विजय मिळवला.

शारजाहमध्ये रंगलेल्या  सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या राजस्थानला पंजाबने अक्षरश: धुतले. मयंक अगरवालचे अप्रतिम शतक आणि कर्णधार राहूलच्या अर्धशतकाच्या मदतीने त्यांनी २२३ धावांचा डोंगर उभा केला. राजस्थानेही प्रत्युत्तरादाखल अतुलनीय खेळाचे प्रदर्शन करताना पंजाबच्या आशा धूसर केल्या. संजू सॅमसनने आणखी एक लाजवाब खेळी करताना संघांला कठीण परिस्थितीतही विजयाची आशा दाखवली. मात्र, ८५ धावांची खेळी करणाऱ्या संजू सॅमसनला शमीने बाद करून सामन्यात रोमांच उभा केला. संजू सॅमसन बाद होताच  राजस्थान रॉयल्सचा पराभव निश्चीत मानला जात असताना राज्यस्थानने अचानक सामना आपल्या बाजूने ओढून आणला. या सामन्यात राजस्थानने एका नवीन हिरोला जन्म दिला. 

पंजाबच्या २२३ धावांचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या राजस्थाचा १०व्याषटकात दुसरा  बळी गेल्यावर राहूल तेवतिया मैदानावर आला. आपल्यावरील दबाव कमी करण्याऐवजी दबाव वाढवण्याचंच काम करणारा राहूल  कालचा सामना झाल्यावर व्हिलन म्हणून समोर येणार असे जवळपास निश्चित झाले होते. त्याला१६व्या शतकापर्यंत मॅक्सवेल, बिश्नोई यांच्या गोलंदाजीवर खेळताना इतक्या अडचणी येत होत्या की, त्याने अनेक बॉल निर्धाव खेळून काढले. १६व्या षटकामध्ये  तेवतिया २३ बॉलमध्ये १७ धावा काढून खेळत होता. संजू सॅमनही आपली अप्रतिम खेळी खेळून परतला होता. आता संघाला विजयासाठी २४ चेंडूंमध्ये ६३ धावांची गरज होती. सगळे प्रमुख फलंदाज बाद होऊन परतल्यामुळे हा सामना राज्यस्थानसाठी हरल्यात जमा होता. पण अचानक व्हिलनच हिरो व्हावा तसा तेवतिया समोर आला. आणि बॅटचा दांडपट्यासारखा वापर करत त्याने सामनाच फिरवला. 

6 6 6 6 0 6....आणि सामना  फिरला  

अठराव्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या कॉट्रेलला स्वप्नातही वाटले नसेल की त्याचे हे षटक ऐतिहासिक ठरणार आहे. त्याच्या पहिल्याच चेंडूवर तेवतियाने षटकार  भिरकावला. पंजाबच्या चाहत्यांनाही वाटले असेल की अंदाजे  गेला असेल. मात्र, एकामागून एक सलग चार षटकार मारल्यानंतर बंद झालेल्या टीव्ही  परत सुरू झाल्या असतील यात शंका नाही. पाचवा चेंडू निर्धाव टाकल्यानंतर कॉट्रेलच्या जीवात जीव आला असेल. मात्र, पुढच्याच चेंडूवर आणखी एक षटकार खेचत तेवतियाने आजचा हिरो मीच असल्याचे दाखवून दिले. अठराव्या षटकानंतर आता राजस्थानला 12 चेंडूंमध्ये फक्त 21 धावांची गरज होती. जोफ्रा आर्चरच्या दोन फटकारांच्या मदतीने तेवतियाने अजून एक षटकार हाणत सामना अक्षरश: खेचून आणला. आयपीयल  स्पर्धेत एका षटकात पाच षटकार मारणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी ख्रिस गेल याच्या नावे हा विक्रम जमा आहे. 

 
 

संबंधित बातम्या