राजस्थान रॉयल्सचा मुंबईवर इंडियन्सवर 'हल्लाबोल'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑक्टोबर 2020

भल्या मोठ्या आव्हानासमोर राजस्थानची २ बाद ४४ अशी अवस्था झाली होती. परंतु स्टोक्‍स-सॅमसन यांनी सुरुवातापासून मुंबई गोलंदाजांवर हल्लाबोल केला. कोठेहे ते मागे पडले आहेत असे जाणवत नव्हते.​

अबुधाबी-  तब्बल २८५ च्या स्ट्राईक रेटने ६० धावांचा झंझावात हार्दिक पंड्याने सादर केला, परंतु त्याला बेन स्टोक्‍सने शतकाचे प्रत्युत्तर दिले त्याला संजू सॅमसनने तोडीस तोड साथ दिली  त्यामुळे मुंबईची १९५ ही भलीमोठी धावसंख्या राजस्थानने पार केली. त्यामुळे गुणतक्‍त्यात पहिल्या तीन स्थानावर असलेल्या संघांना  पराभवाचा धक्का बसला.

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १९५ धावा केल्या, राजस्थानने हे आव्हान आठ चेंडू राखून पार केले. या भल्या मोठ्या आव्हानासमोर राजस्थानची २ बाद ४४ अशी अवस्था झाली होती. परंतु स्टोक्‍स-सॅमसन यांनी सुरुवातापासून मुंबई गोलंदाजांवर हल्लाबोल केला. कोठेहे ते मागे पडले आहेत असे जाणवत नव्हते.

स्टोक्‍स आयपीएलमध्ये आल्यापासून अपयशी ठरत होता. आजच्या सामन्याअगोदर त्याला एकही षटकार मारता आला नव्हता, परंतु आज त्याने ६० चेंडूत १४ चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी करत नाबाद १०७ धावा केल्या. सॅमसनसह त्याने १३.४ षटकांत १५२ नाबाद भागीदारी केली.

गेल्या काही सामन्यात मुंबईच्या फलंदाजी धुरा सांभाळणारा क्विन्टॉन डिकॉक आज मात्र अपयशी ठरला, पहिल्या षटकातच त्याला जोफ्रा आर्चरने बाद केले, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सावरताना चांगला वेगही मिळवला होता.

पंड्याचे तुफान
मुंबईने १० षटकांत ९० अशी मजल मारली होती, परंतु तेव्हाच तीन धक्के बसले. ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार पोलार्ड बाद झाले त्यामुळे मुंबईची २ बाद ९० वरुन ४ बाद १०१ अशी अवस्था झाली होती. अशा वेळी सर्व आशा हार्दिक पंड्यावर होत्या त्याने सुरुवातीला वेळ घेतला ९ चेंडूत ८ धावा त्याने केल्या त्यानंतर मात्र वादळी टोलेबाजी केली. पुढच्या १२ चेंडूत ५२ धावांचा पाऊस पाडला.
 

संबंधित बातम्या