राजस्थान क्लासिक स्क्वॉश स्पर्धेत समैराला ब्राँझपदक

भारतीय स्क्वॉश रॅकेट महासंघाच्या मान्यतेने पार पडली स्पर्धा
Samaira Bhandare wins bronze medal
Samaira Bhandare wins bronze medalDainik Gomantak

पणजी: जयपूर येथे झालेल्या राजस्थान क्लासिक स्क्वॉश स्पर्धेत गोव्याच्या समैरा भंडारे हिने 15 वर्षांखालील मुलींच्या विभागात ब्राँझपदक जिंकले आहे. ही स्पर्धा 1 ते 5 सप्टेंबर या कालावधीत पार पडली.

(Rajasthan Classic Squash Tournament: Goa's Samaira Bhandare wins bronze medal in girls under-15 category)

स्पर्धा भारतीय स्क्वॉश रॅकेट महासंघाच्या मान्यतेने घेण्यात आली होती. राजस्थान येथील जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवरील सुरभी मिश्रा स्पोर्टस फाऊंडेशन येथे स्पर्धेतील सामने झाले. या स्पर्धेत देशातील 20 राज्यातील तीनशेहून जास्त खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत मुलांच्या 15 वर्षांखालील गटात गोव्याच्या अब्दुस समद शाह याला चौथा क्रमांक मिळाला. स्पर्धेतील गोव्याच्या दोन्ही खेळाडूंना रेहमान हुबळी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

समैराच्या गुणवत्तेचे कौतुक

भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत खेळलेल्या सुरभी मिश्रा यांनी समैरा भंडारेच्या कामगिरीचे कौतुक केले. सुरभी यांनी सांगितले, की ``समैरा अतिशय गुणवान खेळाडू आहे. देशातील सर्वोत्तम खेळाडूंत येण्याइतपत तिच्यापाशी प्रतिभा आहे.

आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशातील अनुभवी सीनियर खेळाडूंविरुद्ध खेळल्यानंतर तिच्या अनुभवात आणखी भर पडेल.`` सुरभी यांनी 2010 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, तसेच 2006 मधील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच 2008 मधील जागतिक ज्युनियर स्क्वॉश स्पर्धेत ब्राँझपदक पटकावले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com