राजस्थान आणि हैदराबाद यांचा अस्तित्वाचा लढा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

हैदराबादला आता एकही हार परवडणार नाही, तर राजस्थान आघाडीच्या संघात जाण्यास उत्सुक आहे. 

दुबई-  राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद आयपीएलमधील आशा राखण्यासाठी उद्या लढतील. सामन्यातील विजेत्या संघास प्ले ऑफची धूसर संधी असेल. 

हैदराबादचे प्रियम गर्ग, अब्दुल समाद तर राजस्थानचे कार्तिक त्यागी, रियान पराग यांच्यावर त्यांच्या संघातील वरिष्ठ अपयशी ठरल्यास जास्त अपेक्षा असतील. हैदराबादला आता एकही हार परवडणार नाही, तर राजस्थान आघाडीच्या संघात जाण्यास उत्सुक आहे. 

जोफ्रा आर्चरच्या प्रभावी गोलंदाजीस श्रेयस गोपाल आणि राहुल तेवतियाची साथ लाभली तर विजयाची संधी असेल हे राजस्थान संघ जाणतो. त्यांच्यासमोर फलंदाजीचे आव्हान आहे. भुवनेश्‍वर कुमार आणि मिशेल मार्शच्या दुखापतीमुळे कमकुवत झालेल्या हैदराबादला केन विलियमसनच्या अनुपस्थितीसही सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.

दोन्ही संघांची परिस्थिती-    

  • यापूर्वीच्या सामन्यात राजस्थानची पाच विकेटनी सरशी
  •     गुणतक्‍त्यात राजस्थान सहावे, तर हैदराबाद सातवे
  •      राजस्थानचे १० सामन्यात ४ विजय, ६ पराभव, तर हैदराबाद ९ सामन्यात ३ विजय, सहा हार
  •      यापूर्वीच्या लढतीत राजस्थानचा चेन्नईविरुद्ध विजय, तर हैदराबादची कोलकताविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये हार

संबंधित बातम्या