IPL: राजस्थान रॉयल्सच्या रियान परागने मोडला रोहित शर्मा, जडेजाचा विक्रम

चालू मोसमात रियान परागने आतापर्यंत 15 झेल घेतले आहेत.
Riyan Parag
Riyan Parag Dainik Gomantak

राजस्थान रॉयल्सचा युवा अष्टपैलू खेळाडू रियान परागने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या 20 वर्षीय स्टार क्रिकेटरने रवींद्र जडेजा आणि रोहित शर्मा यांचा विक्रम मोडला आहे. (Rajasthan Royal's player Riyan Parag breaks Ravindra Jageja and Rohit Sharma's record)

Riyan Parag
स्टेडिअममध्येच प्रपोज करणारा भारताचा 'तो ' गोलंदाज अडकणार लग्न बेडीत

शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात दोन झेल घेतल्याने रियान आयपीएलच्या (IPL) एकाच मोसमात सर्वाधिक झेल घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. चालू मोसमात त्याने आतापर्यंत 15 झेल घेतले आहेत. त्याच्या आधी रोहित शर्माने 2012 मध्ये 13 तर रवींद्र जडेजाने 2013 आणि 2021 मध्ये 13 झेल घेतले होते.

Riyan Parag
टायगर कप अखिल गोवा आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेत दवर्ली, ड्युन्स क्लबची विजयी कूच

आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत रियान एबी डिव्हिलियर्सच्या विक्रमाच्या जवळ पोहोचला आहे. आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक झेल पकडण्याचा विक्रम आजही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. त्याने 2016 मध्ये 19 झेल घेतले होते. पराग आता या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रियान राजस्थान रॉयल्ससाठी एका मोसमात सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या बाबतीत कर्णधार संजू सॅमसनला मागे टाकले आहे. सॅमसनने 2013 मध्ये 13 झेल घेतले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com