MI vs RR IPL 2022: फिरकीच्या जादूगाराला राजस्थान रॉयल्स वाहणार श्रध्दांजली

रॉयल्स (Rajasthan Royals) त्यांचा आयपीएल विजेता कर्णधार शेन वॉर्नला श्रद्धांजली वाहणार आहे.
Rajasthan Royals
Rajasthan RoyalsDainik Gomantak

इंडियन प्रीमियर लीगमध्ये सलग तीन सामने जिंकणारा राजस्थान रॉयल्स शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आपली विजयी मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. या सामन्यादरम्यान रॉयल्स त्यांचा आयपीएल विजेता कर्णधार शेन वॉर्नलाही (Shane Warne) श्रद्धांजली वाहणार आहे. वॉर्नचे गेल्या महिन्यात थायलंडमध्ये निधन झाले होते. त्याच्या नेतृत्वाखाली, रॉयल्सने 2008 मध्ये आयपीएलचा पहिला हंगाम जिंकला होता. आता संघ त्याला विजयासह लक्षात ठेवू इच्छितो.

दरम्यान, पॉइंट टेबलमध्ये रॉयल्स गुजरात टायटन्सनंतर (Gujarat Titans) दुसऱ्या स्थानावर असून त्यांनी आतापर्यंत सहा सामने जिंकले आहेत. आठ सामने गमावल्यानंतर मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात केवळ 144 धावा करु शकलेल्या रॉयल्सला त्यांच्या फलंदाजांकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

Rajasthan Royals
9 वर्ष घरी गेला नाही, आता कार्तिकेय सिंहला मिळाली IPL 2022 मध्ये संधी

मुंबईसाठी बटलरचे मोठे आव्हान असेल

सलामीवीर जोस बटलर आणि देवदत्त पडिक्कल शानदार फॉर्ममध्ये आहेत. बटलरने आतापर्यंत तीन शतके झळकावली असून मुंबईच्या गोलंदाजांसाठी त्याच्या बॅटवर नियंत्रण ठेवणे आव्हान असणार आहे. दुसरीकडे, बटलर आणि पडिक्कल पुन्हा एकदा संघाला चांगली सुरुवात करुन देतील. कर्णधार संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर देखील स्वबळावर सामने जिंकू शकतात. गेल्या सामन्यात नाबाद 56 धावा करणाऱ्या रियान पराग आणि डॅरिल मिशेल यांच्यामुळे रॉयल्सची मधली फळीही मजबूत आहे. सॅमसनने दहा सामन्यांमध्ये 232 धावा केल्या आहेत.

त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू शानदार फॉर्ममध्ये आहेत. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि यजुवेंद्र चहलने देखील आपल्या फिरकीचा जलवा दाखवला आहे. चहलने सर्वाधिक 18 विकेट घेतल्या आहेत. फास्ट बॉलर ट्रेंट बोल्टला प्रसिद्ध कृष्णाच्या रुपाने चांगला साथीदार मिळाला आहे.

Rajasthan Royals
IPL 2022: मुंबई इंडियन्सने घेतला नवीन खेळाडू, आता जिंकतील का?

मुंबईला नव्या सुरुवातीची गरज

दुसरीकडे, मुंबईला सामूहिक प्रयत्न करावे लागतील. खराब टप्प्यातून जात असलेल्या रोहित शर्मा आणि इशान किशनला धावा काढाव्या लागतील. 15 कोटी 25 लाख रुपयांना विकत घेतलेल्या ईशानला आठ सामन्यांत केवळ 199 धावा करता आल्या. सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा आणि देवाल्ड ब्रेविस यांनी अधूनमधून आपला जलवा दाखवला. परंतु त्यांना एक युनिटी म्हणून खेळावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com