राजस्थानचा स्टार गोलंदाज चेतन सकारियाच्या वडिलांचं कोरोनाने निधन

दैनिक गोमंतक
रविवार, 9 मे 2021

लिलावाच्या काही काळआधीच त्याचा धाकटा भाऊही मरण पावला.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2021) या मोसमात राजस्थान रॉयल्सचा (Rajashtan Royals) स्टार गोलंदाज चेतन सकारीयाच्या (Chetan Sakariya) वडीलांचं निधन झाले आहेत. सकारियाच्या वडिलांना कोरोनाची (Coronavirus) लागण झाली होती. चेतनचे वडील कांजीभाई यांची प्रकृती गेल्या आठवड्यात कोरोनामुळे खालावली होती. सकरियाच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण चेतनचे  वडिल कोरोनाची लढाई जिंकू शकले नाहीत. आयपीएल पुढे ढकलल्यानंतर, सकरिया परत त्याच्या घरी गेला होता. आयपीएलच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने चेतन सकारियाला 1.20 कोटी रुपयांना विकत घेतले होते. (Rajasthan star bowler Chetan Sakaria's father dies due to corona)

गोवा फुटबॉलचे ज्येष्ठ उपाध्यक्ष लव्हिनियो रिबेलो यांचे निधन

लिलावाच्या काही काळआधीच त्याचा धाकटा भाऊही मरण पावला. आयपीएल दरम्यान सेहवागनं (Virendra Sehwag) सकरियाच्या आयुष्यातील काही दुख:द क्षण सोशल मीडियावर शेअर केले. आयपीएल 2021 मध्ये सकारिया हिरो म्हणून उदयास आला.राजस्थान रॉयल्सने ट्वीटद्वारे माहिती दिली “हे दुर्दैव आहे आणि या क्षणी आमची त्याच्या कुटुंबासमवेत प्रार्थना आहे.” पुढे ट्विटमध्ये लिहिले  श्री कांजीभाई सकारिया यांनी कोरोनासोबतची लढाई हरवली आम्हाला अतिशय वाईट वाटले आहे. तत्पूर्वी, आम्ही चेतनच्या संपर्कात आहोत आणि या कठीण परिस्थितीत त्याला आणि त्याच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करू.

आयपीएल 2021 मध्ये सात बळी घेणाऱ्या चेतनने यावर्षी जानेवारीत आपला भाऊ गमावला. हा भाऊ जलदगती गोलंदाज होतो. तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत होता. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय महिला क्रिकेटपटू वेद कृष्णमूर्ती हिने आपली बहीण वत्सला आणि आईला कोरोनामुळे गमावले. यावेळी, भारतातील कोरोनाची अवस्था अत्यंत भयावह आहे.

संबंधित बातम्या