IPL 2021 : अखेर BCCI ला आली जाग; खेळाडूंच्या लसीकरणासाठी आरोग्य मंत्रालयाच्या संपर्कात

दैनिक गोमन्तक
रविवार, 4 एप्रिल 2021

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आधी खेळाडूंच्या लसीकरणाचा विचार करण्यास भाग पाडले आहे.

देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आधी खेळाडूंच्या लसीकरणाचा विचार करण्यास भाग पाडले आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज याबाबतची माहिती देताना, खेळाडूंच्या लसीकरणासाठी बीसीसीआय आरोग्य मंत्रालयाशी संपर्क साधणार असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारावर लसीकरण हाच उपाय आपल्याला वाटत असल्याचे राजीव शुक्ला यांनी आज सांगितले. (Rajiv Shukla said the BCCI is in touch with the health ministry to vaccinate the players)

यंदाच्या आयपीएल स्पर्धेचा हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. परंतु, देशभरात कोरोनाच्या विषाणूने पुन्हा तोंड वर काढल्यामुळे देशात होणाऱ्या या स्पर्धेवर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट पसरले असल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआय देखील खेळाडूंना कोरोनाची लस देण्याचा विचार करत असल्याचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी आज सांगितले. याशिवाय, कोरोनाचा प्रभाव कधी संपणार हे कोणालाच माहित नसल्यामुळे आणि आपण देखील याबाबत काहीच वर्तवू शकत नसल्यामुळे खेळाडू देखील ठीकपणे मैदानात उतरू शकणार नसल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. आणि त्यामुळेच खेळाडूंच्या लसीकरणाचा विचार करणे भाग असल्याचे मत राजीव शुक्ला यांनी व्यक्त केले. 

नटराजन आणि शार्दूल ठाकूर नंतर मोहोम्मद सिराजला मिळाले आनंद महिंद्रांचे खास...

यानंतर, खेळाडूंच्या लसीकरणाबाबत बीसीसीआय (BCCI) नक्कीच विचार करत असून खेळाडूंना लस दिली जावी यासाठी बीसीसीआय आरोग्य मंत्रालयाशी संपर्कात असल्याचे राजीव शुक्ला यांनी सांगितले. यापूर्वी, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ लागल्यामुळे मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांचे नियोजन अन्य ठिकाणी हलविण्याचा विचार आयपीएल गव्हर्निंग काउन्सिल (जीसी) करत असल्याची माहिती मिळाली होती. मुंबई सह इंदोर आणि हैद्राबाद मध्ये देखील कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे ही दोन ठिकाणे देखील स्टॅण्डबाय ठेवण्यात आल्याचे समजते. 

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघातील अक्षर पटेल, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील देवदत्त पद्दीकल आणि चेन्नई सुपर किंग्स संघातील एका स्टाफ मेंबरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. शिवाय मुंबईतील वानखेडे स्टेडियम मधील काही कर्मचाऱ्यांना देखील कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती मिळाली होती. तर 9 एप्रिलपासून यंदाच्या आयपीएलचा चौदावा हंगाम सुरु होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये पहिला सामना खेळवण्यात येणार आहे.      

संबंधित बातम्या