Under19: 'या' खेळाडूवर वय लपवल्याचा आरोप, बीसीसीआय कडे प्रकरण

महाराष्ट्राचे क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंगरगेकर चे खरे वय हे 21 वर्षे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हुंगरगेकर हे तेरणा पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आहेत.
Rajvardhan Hangargekar
Rajvardhan HangargekarDainik Gomantak

नुकत्याच झालेल्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगरगेकर वयाच्या वादात सापडल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे (Maharashtra) क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुंगरगेकर यांचे खरे वय हे 21 वर्षे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हुंगरगेकर हे तेरणा पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आहेत. शाळेच्या नोंदीनुसार, त्याची मूळ जन्मतारीख ही 10 जानेवारी 2001 होती, जी इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत समान राहिली. मात्र, इयत्ता आठवीमध्ये प्रवेश देताना मुख्याध्यापकांनी त्यात बदल करून त्याची जन्मतारीख ही 10 नोव्हेंबर 2002 अशी केली. याचाच अर्थ नुकत्याच झालेल्या अंडर-19 विश्वचषकादरम्यान हुंगरगेकर हा 21 वर्षांचा होता. (Rajvardhan Hangargekar Accused Of Concealing Age BCCI To Probe Fraud Case)

Rajvardhan Hangargekar
VIDEO: भुवनेश्वर कुमारवर रोहित शर्मा का चिडला?

19 वर्षांखालील विश्वचषकातील कामगिरीच्या जोरावर हंगरगेकरला आयपीएल (Ipl) लिलावात चेन्नई सुपर किंग्जने (CSK) 1.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते. 8 फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्रात बकोरिया यांनी बीसीसीआयचे (Bcci) सचिव जय शाह यांना लिहिले की, खेळाडूने आपली जन्मतारीख बदलली आहे. तपास व अहवालानुसार श्री. राजवर्धन हंगरगेकर ने आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात ही तेरणा पब्लिक स्कूल, उस्मानाबाद येथून केल्याचे उघड झाले आहे. हे महाराष्ट्र सरकारने सेट केलेल्या शाळा द्वारे नियंत्रित केले जाते. शाळेने हुंगरगेकर यांची जन्मतारीख "अनधिकृतपणे दुरुस्त" केल्याचा आरोप ही आयुक्तांनी केला.

तेरणा पब्लिक स्कूल, उस्मानाबाद यांनी ठेवलेल्या कॉमन रजिस्टरनुसार राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar) ची जन्मतारीख ही 10/01/2001 आहे. जेव्हा इयत्ता 8 वी मध्ये नवीन अर्ज केला होता तेव्हा मुख्याध्यापकाने अनधिकृत दुरुस्त्या केल्या होत्या आणि त्यांची जन्मतारीख ही 10/11/2002 अशी नोंद करण्यात आली होती . मुख्याध्यापकांना जन्मतारखेत काही दुरूस्ती करायची असल्यास संबंधित जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, राजवर्धन हुंगरगेकर यांची जन्मतारीख बदलण्यासाठी अशी कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही.

राजवर्धन हंगरगेकरने बनावट रेकॉर्डच्या आधारे भारतीय संघात स्थान मिळवले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (IAS) जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या अहवालानुसार, सदर खेळाडूची जन्मतारीख 10/01/2001 आहे. अशा परिस्थितीत, स्पर्धेच्या वेळी त्याचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त होते. ही वस्तुस्थिती असूनही, त्याने आयसीसी अंडर-19 (Under19) विश्वचषक 2022 मध्ये सहभागी होणाऱ्या अंडर-19 संघात स्थान मिळवले आहे.

राजवर्धन हंगरगेकर यांचे वर्तन खेळातील सचोटी आणि नैतिकतेच्या विरोधात आहे. हे निष्पक्ष खेळ नाकारते आणि राष्ट्राच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवते. त्यामुळे कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. तसे पत्र महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांनाही लिहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com