रणजी संघ प्रशिक्षक निवड लांबणीवर

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

गतमोसमातील गणेश यांचे नाव आघाडीवरपण जीसीएचे शिक्कामोर्तब नाही

पणजी

गतमोसमात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याला उपांत्यपूर्व फेरीत नेलेले दोड्डा गणेश यांना यंदाच्या मोसमातही संघ प्रशिक्षकपदी मुदतवाढ मिळण्याची शक्यता असलीतरी गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) अजून त्यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. त्यामुळे निवड लांबणीवर पडलेली आहे.

कोरोना विषाणू महामारीमुळे जीसीएची बैठक झालेली नाही. यामुळे प्रशिक्षक नियुक्तीविषयकतसेच अन्य निर्णय प्रलंबित आहेत. ‘‘रणजी संघ प्रशिक्षक नियुक्तीबाबत आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही,’’ असे जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी शुक्रवारी सांगितले. सध्या क्रिकेट ठप्प असल्यामुळे संघटनेला प्रशिक्षक नियुक्तीची घाई नसल्याचे फडके यांच्या वक्तव्यावरून जाणवते.

प्राप्त माहितीनुसारगतमोसमात विविध वयोगट स्पर्धेतील गोव्याचे प्रशिक्षक कायम राहण्याचे संकेत आहेतयामध्ये १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक कर्नाटकचे राजेश कामत यांचाही समावेश असेल. गतमोसमात स्वप्नील अस्नोडकर यांनी २३ वर्षांखालीलरॉबिन डिसोझा यांनी १६ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. रणजी संघ प्रशिक्षकपदासाठी अन्य उमेदवार नसल्यास माजी कसोटी वेगवान गोलंदाज गणेश यांच्याच नावावर आणखी एका मोसमासाठी शिक्कमोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

अगोदर कोविड-१९ मुळे लॉकडाऊन आणि आता पाऊस यामुळे गोव्यातील क्रिकेटपटू सध्या सांघिक सरावापासून दूरच आहेत. कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सावध पावले टाकत आहेएकंदरीत परिस्थितीचे आकलन केल्यानंतर २०२०-२१ मोसमातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक बीसीसीआय जाहीर करण्याची शक्यता आहे.

 यापूर्वी चार वेळा प्रशिक्षक

भारताकडून चार कसोटी सामने खेळलेल्या कर्नाटकच्या दोड्डा गणेश यांनी २००७-०८२००८-०९२०१२-१३ व २०१९-२० असे चार वेळा गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रणजी स्पर्धेत गोव्याचा संघ २९ सामने खेळला असून ११ विजय२ पराभव आणि १६ अनिर्णित अशी कामगिरी आहे. संघाने २००८-०९ मोसमात प्लेट गटाची उपांत्य फेरीतर गतमोसमात उपांत्यपूर्व फेरी गाठली.

 

संबंधित बातम्या