दीपिका-रणवीरही होणार IPL संघांचे मालक?

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) यांनी नवीन आयपीएल (IPL 2022) संघ खरेदी करण्यासाठी निविदाही सादर केल्या आहेत.
दीपिका-रणवीरही होणार IPL संघांचे मालक?
IPL 2022 मध्ये दोन नवीन संघांच्या खरेदीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि तिचा पती रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचे नावही सामील Dainik Gomantak

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मध्ये दोन नवीन संघ (Two New Teams) जोडले जातील. म्हणजेच एकूण 10 संघ या स्पर्धेत असतील. या संघांना खरेदी करण्यासाठी मँचेस्टर युनायटेड सारख्या मोठ्या फुटबॉल क्लबचे मालक आणि फॉर्म्युला 1 चे माजी मालक यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आता या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि तिचा पती रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचे नावही सामील झाले आहेत.

याशिवाय, भारतातील जिंदाल स्टील (Jindal Steel) समूहाच्या मालकाचे नावही यादीत समाविष्ट आहे. संघ खरेदीसाठी निविदा सादर करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर झाली आहे.

IPL 2022 मध्ये दोन नवीन संघांच्या खरेदीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि तिचा पती रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचे नावही सामील
Man U, Formula 1 आता आयपीएलच्या मैदानात

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी नवीन आयपीएल संघ खरेदी करण्यासाठी निविदाही सादर केल्या आहेत. आयपीएलशी बॉलिवूडचे कनेक्शन नवीन नाही. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची टीम शाहरुख खान आणि जुही चावला यांच्या मालकीची आहे. तर प्रीती झिंटा पंजाब किंग्जची आणि शिल्पा शेट्टी राजस्थान रॉयल्सची मालक आहे. यात आता दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचे नाव देखील जोडले जाण्याची शक्यता आहे. दीपिकाचे वडील देखील एका क्रीडापटू आहेत, तिचे वडील प्रकाश पादुकोण ऑल इंग्लंड बॅडमिंटनचे चॅम्पियन राहिले आहेत. त्याचबरोबर पती रणवीर सिंग सध्या फुटबॉलमध्ये इंग्लिश प्रीमियर लीगशी संबंधित आहे. तसेच तो लोकप्रिय बास्केटबॉल लीग NBA चा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहेत.

IPL 2022 मध्ये दोन नवीन संघांच्या खरेदीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि तिचा पती रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचे नावही सामील
IPL 2022 10 संघमध्ये होणार, लवकरच जाहिर होणार दोन नवीन संघांची नावे

आयपीलच्या नवीन संघाच्या मालकांची नावे 25 ऑक्टोबर रोजी दुबईतून जाहीर केली जाऊ शकतात. त्याआधी 24 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) निविदेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट निश्चित केली होती. नंतर ही मुदत वाढवून 10 ऑक्टोबर करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्यांदा ती पुन्हा वाढवून शेवटची तारीख 20 ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली. अर्ज खरेदी करण्यासाठी फी 10 लाख रुपये निश्चित करण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com