अफगानी पठाणचा T20 मध्ये जलवा, असा विक्रम करुन वर्ल्ड क्रिकेटला केले थक्क
Rashid KhanDainik Gomantak

अफगानी पठाणचा T20 मध्ये जलवा, असा विक्रम करुन वर्ल्ड क्रिकेटला केले थक्क

राशिद खानने (Rashid Khan) लखनौविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

IPL 2022: राशिद खानने लखनौविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. राशीदने 4 विकेट घेत एक खास विक्रम केला. राशीदने आता T20 मध्ये 450 बळी पूर्ण केले आहेत. ब्राव्होने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. ब्राव्होने T20 मध्ये 585 विकेट्स घेण्याचा चमत्कार केला आहे. त्याच वेळी, इम्रान ताहिर दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याच्या नावावर टी-20 मध्ये 451 विकेट्स आहेत. अशा परिस्थितीत राशीद टी-20मध्ये 450 बळी घेणारा केवळ तिसरा गोलंदाज ठरला आहे. (Rashid Khan becomes the third bowler to complete his 450th wicket in T20 cricket)

दरम्यान, लखनऊ विरुद्धच्या सामन्यात राशीदने (Rashid Khan) शानदार गोलंदाजी केली. त्याने 3.5 षटकात 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. राशीदने आवेश खानला सामन्यात बाद करताच टी-20 क्रिकेटमध्ये (T20 Cricket) 450 बळी पूर्ण केले.

Rashid Khan
IPL 2022: MI ठरला प्लेऑफमधून बाहेर पडणारा पहिला संघ

दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, गुजरातने लखनौचा 62 धावांनी पराभव करुन स्पर्धेत आपला 9 वा विजय नोंदवला. लखनौला हरवून गुजरात प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. म्हणजेच प्लेऑफमध्ये पोहोचणारा गुजरात पहिला संघ ठरला आहे. गुजरातने लखनौला 145 धावांचे लक्ष्य दिले होते. गुजरातच्या (Gujarat) गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत लखनौचा संपूर्ण संघ 82 धावांतच बाद झाला.

Rashid Khan
IPL 2022: माजी प्रशिक्षकाने निवडली 'ऑल टाईम फेमस टीम', सचिन करणार सलामी

शिवाय, गुजरातकडून राशिद खानने 4 बळी घेतले. याशिवाय यश दयाल आणि साई किशोर यांनी 2-2 विकेट घेत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात लखनौचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आणि दीपक हुडाने सर्वाधिक धावा केल्या. हुडाने 27 धावा केल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.