रवी शास्त्री आणि सौरव गांगुलींमध्ये ऑल इज नॉट वेल ?

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत शाबासकी देणारे ट्विट केले, मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर शास्त्री यांना फारच ट्रोल करण्यात आले.

मुंबई :  टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत शाबासकी देणारे ट्विट केले, मात्र बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचा उल्लेखही केला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर शास्त्री यांना फारच ट्रोल करण्यात आले.

अशक्‍य ते शक्‍य तुम्ही करून दाखवले...असा उल्लेख करताना शास्त्री यांनी बीसीसीआय सचिव जय शहा, आयपीएलचे कार्याध्यक्ष ब्रिजेश पटेल, बीसीसीआयचे हंगामी सीईओ हेमांग अमिन यांचा उल्लेख केला, परंतु गांगुली यांचे नाव टाळले. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि पहिल्यावहिल्या आयपीएलचा विजेता कर्णधार शेन वॉर्ननेही आयपीएलच्या यशस्वी आयोजनाबाबत ट्‌विट करताना गांगुली आणि सर्व आयपीएल संघ आणि खेळाडूंचे अभिनंदन 
केले. या ट्‌विटचा दाखला देत काहींनी म्हटले आहे, ‘काही जणांना कोणाला श्रेय द्यायचे हे बरोबर कळत असते’

संबंधित बातम्या