IPL2021 DCvsCSK : ''आजचा सामना 'गुरु विरुध्द शिष्य' असा रंगणार''

दैनिक गोमंतक
शनिवार, 10 एप्रिल 2021

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचा यंदाचा हंगाम काल पासून सुरु झाला. आयपीएल स्पर्धेच्या चौदाव्या मोसमाच्या सुरवातीचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला.

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचा यंदाचा हंगाम काल पासून सुरु झाला. आयपीएल स्पर्धेच्या चौदाव्या मोसमाच्या सुरवातीचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. अटीतटीच्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने मुंबई इंडियन्स संघावर दोन गडी राखून विजय मिळवला. आणि त्यासह प्रत्येक वर्षीप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या संघाला यंदा देखील आपला पहिला सामना गमवावा लागला आहे. त्यानंतर आज आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन संघ मैदानावर आमने-सामने उतरणार आहेत. त्यामुळे या दोन संघातील सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री हे चांगलेच उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. (Ravi Shastri said todays match between CSK and DC was a disciple against Guru)

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात 'स्लो' गतीने टाकलेला चेंडू माहीतीयं का?

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील दुसरा सामना मागील तेराव्या हंगामातील उपविजेता संघ दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे दिल्ली संघाचा नवीन कर्णधार रिषभ पंत याचा सामना महेंद्रसिंग धोनीशी होणार आहे. म्हणूनच भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी हा सामना म्हणजे 'गुरु विरूद्ध शिष्य', असा होत असल्याचे म्हटले आहे. रवी शास्त्री यांनी सोशल मीडियावरील ट्विटर वरून या सामन्याबाबत भाष्य केले आहे. यामध्ये रवी शास्त्री यांनी ट्विट करतानाच गुरु विरुद्ध चेला, असे लिहिले आहे. याशिवाय, त्यांनी पुढे खूप मजा येणार असल्याचे म्हणत स्टम्प माइक नक्की ऐका, असे आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे. तसेच, या ट्विट मध्ये रवी शास्त्री यांनी #DhoniReturns #Pant #IPL2021 असे कॅप्शन देखील दिले आहेत.

माजी क्रिकेटपटू लक्ष्मणची सोशल मिडियावर ‘दिल छु जाने वाली’ पोस्ट  

रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सोशल मीडियावरील केलेल्या या ट्विटचा विचार केल्यास, महेंद्रसिंग धोनी हा जगातील सर्वोत्तम विकेटकिपर असल्याचे सर्वांनाच माहित आहे. याशिवाय महेंद्रसिंग (MahendraSingh Dhoni) धोनी हा सामन्याच्या वेळेस प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर दबाव आणण्यासाठी नेहमीच विकेटकिपिंग करत असताना काहिनाकाहीतरी बडबडत असतो. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीची हीच कला विकेटकिपर असलेल्या (Rishabh Pnat) रिषभ पंतने देखील आत्मसात केलेली असल्याचे मागील काही दिवसांपासून पाहायला मिळते आहे. शिवाय रिषभ पंत हा वेळोवेळी महेंद्रसिंग धोनीकडून खेळाचे धडे घेत असतो. त्यामुळेच कदाचित रवी शास्त्री यांनी आजच्या सामन्यात अधिक मजा येणार असल्याचे ट्विट केले आहे. 

दरम्यान, आयपीएलच्या कारकिर्दीत मुंबई इंडियन्सच्या संघानंतर सर्वात यशस्वी संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्सचा संघ ओळखला जातो. परंतु, मागील वर्षी संयुक्त अरब अमीरातीत झालेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नईच्या संघाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नव्हती. इतकेच नाही तर, चेन्नईच्या संघाला प्लेऑफ मध्ये देखील पोहचता आले नव्हते. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी अंतिम सामान्यापर्यंत पोहचला होता.                     

संबंधित बातम्या