रवी शास्त्रींना पुन्हा मैदानात आल्याचा आनंद

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

‘मिशन ऑस्ट्रेलिया’ या मोहिमेस सुरुवात करत असताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आजपासून संघाबरोबर सराव सुरू केला. पुन्हा मैदानात आल्याचा आनंद, अशा आशयाचे ट्‌विट करताना त्यांनी शिखर धवन, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर यांच्याबरोबरचे छायाचित्र पोस्ट केले आहे.

सिडनी : ‘मिशन ऑस्ट्रेलिया’ या मोहिमेस सुरुवात करत असताना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आजपासून संघाबरोबर सराव सुरू केला. पुन्हा मैदानात आल्याचा आनंद, अशा आशयाचे ट्‌विट करताना त्यांनी शिखर धवन, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर यांच्याबरोबरचे छायाचित्र पोस्ट केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळणार आहे. २७ नोव्हेंबरपासून या मोहिमेस सुरुवात होत आहे. या दिवशी पहिला एकदिवसीय सामना होणार आहे. भारतीय खेळाडूंसह रवी शास्त्री आणि इतर सपोर्ट स्टाफ दुबईतून सिडनीस रवाना झाला. १२ तारखेला सिडनीत दाखल झाल्यावर दोन आठवड्यांचे विलगीकरण सुरू झाले. लगेचच सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि ती निगेटिव्ह आल्यानंतर १४ तारखेपासून काही खेळाडूंनी सराव सुरू केला.

संबंधित बातम्या