रवी शास्त्रींनी भारतीय क्रिकेटचं 36 क्रमांकाबरोबरचं खास कनेक्शन केलं शेअर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मार्च 2021

सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानचा पराभव केला तेव्हा 10 मार्च 1985 रोजीचा जल्लोष क्रिकेटप्रेमी अजूनही विसरले नसतील. 36 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला आठ गडी राखत पराभूत करून भारताने 'बेन्सन अँड हेजेस' स्पर्धा जिंकली.

नवी दिल्ली : सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानचा पराभव केला तेव्हा 10 मार्च 1985 रोजीचा जल्लोष क्रिकेटप्रेमी अजूनही विसरले नसतील. 36 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला आठ गडी राखत पराभूत करून भारताने 'बेन्सन अँड हेजेस' स्पर्धा जिंकली. या स्पर्धेला 'मिनी वर्ल्ड कप' असेही म्हटले गेले होते. या स्पर्धेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा पुरस्कार म्हणून नवीन ग्लॅमरस ऑडी कार देण्यात आली. विजयाच्या आनंदात, भारतीय संघाने या कारमध्ये स्वार होऊन संपूर्ण मैदानाची चक्कर मारली.

INDVsENG T20 Series : भारत विरूद्ध इंग्लंड पहिला T20 सामना आज

रवी शास्त्रींनीही अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकलं होतं. शास्त्रींनी 36 वर्षांपूर्वीच्या या अविस्मरणीय विजयाचे क्षण पुन्हा आठवले आहेत. रवी शास्त्रींनी ,'खूप सारे 36, माझे सहा षटकार. अ‍ॅडिलेडमध्ये टीमच्या 36 धावा. वनडेमध्ये भारताकडून खेळणारा 36 वा खेळाडू. गावस्कर 36. युवराजसिंगचे 6 षटकार..' अशा आशयाचं ट्विट केलं आहे. रवी शास्त्री हे भारताकडून एकदिवसीय सामना खेळणारे 36 वे खेळाडू आहेत. याशिवाय त्यांनी 6 चेंडूत 6 षटकारही ठोकले आहेत.

2007 मध्ये T20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर मारलेल्या 6 षटकारांनंतर युवराज सिंगने अनेक विक्रम केले होते. मात्र, एका षटकात सहा षटकार मारणारा युवराज सिंग पहिला भारतीय फलंदाज नव्हता. रवी शास्त्री यांनी त्यांच्या आधी हा पराक्रम केला होता. 10 जानेवारी 1985 रोजी रवि शास्त्रींनी एका षटकात सहा षटकार ठोकले आणि असे करणारा तो पहिला भारतीय ठरले. जगात प्रथमच हा पराक्रम करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या गॅरी सोबर्सच्या नावावर होता, त्यांनी 1968 मध्ये हा विक्रम केला होती.  

स्वयंगोलमुळे स्पोर्टिंगचा विजय हुकला; पहिल्या बरोबरीमुळे सेझा अकादमीविरुद्ध एकच गुण

रणजी करंडक सामन्यात मुंबईकडून खेळणाऱ्या रवी शास्त्रींनी बडोद्याविरुध्द अर्धवेळ गोलंदाज टिळक राज गोलंदाजीला येताच रवी शास्त्रींनी एका ओव्हरमध्ये सहा षटकार लगाववले.  अशी खेळी करत शास्त्रींनी 123 चेंडूत दुहेरी शतक ठोकले, जे त्यावेळचे सर्वात वेगवान दुहेरी शतक ठरले होते. 

संबंधित बातम्या