Team India: रवींद्र जडेजाचे बल्ले-बल्ले, कसोटी मालिकेदरम्यान ICC ने केली 'ही' मोठी घोषणा

ICC Men's Player of the Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी क्रिकेटपटू नॉमिनेट केले आहेत.
Ravindra Jadeja | Rohit Sharma
Ravindra Jadeja | Rohit SharmaDainik Gomantak

ICC Men's Player of the Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी क्रिकेटपटू नॉमिनेट केले आहेत.

भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा, इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक आणि वेस्ट इंडिजचा फिरकीपटू गुडाकेश मोती यांची ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या लढाईत भारतासाठी मालिकेत दमदार सुरुवात केल्यानंतर जडेजाची प्रथमच निवड करण्यात आली आहे.

रवींद्र जडेजासाठी मोठी बातमी

कसोटी नंबर वन अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपली ताकद दाखवून दिली आहे. टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

जडेजाने अनुकूल परिस्थितीचा वापर करुन महिनाभरात 17 ऑस्ट्रेलियन विकेट घेतल्या, ज्यात दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत 42 धावांत सात बळी घेतले.

तितक्याच प्रभावी फलंदाजीने, पहिल्या कसोटीत त्याच्या 70 धावांच्या खेळीने भारताला (India) सुरुवातीच्या यशाचा सूर गवसला. शानदार कामगिरीमुळे त्याला दोन्ही सामन्यांमध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

Ravindra Jadeja | Rohit Sharma
Team India: केएल राहुलची कोण घेणार जागा? कसोटी उपकर्णधारासाठी 'हे' 3 खेळाडू आहेत पर्याय

हॅरी ब्रूकने शानदार कामगिरी केली

गेल्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याच्या विस्फोटक फलंदाजीनंतर ब्रूकने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने प्रगती केली आहे.

यातच, त्याला नॉमिनेट करण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये त्याने न्यूझीलंडनविरुद्ध विस्फोटक कामगिरी केली होती.

दोन कसोटीत त्याच्या 329 धावांमध्ये वेलिंग्टन येथील दुसऱ्या कसोटीतील शानदार 186 धावांचा समावेश होता. एका डावात 24 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता.

Ravindra Jadeja | Rohit Sharma
Team India: 'प्लेअर ऑफ द मंथ' साठी या दोन खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा, ICC घेणार अंतिम निर्णय

गुडाकेश मोतीने शानदार गोलंदाजी केली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 'प्लेअर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी वेस्ट इंडिजचा फिरकीपटू गुडाकेश मोतीला नॉमिनेट करण्यात आले आहे.

फेब्रुवारीच्या सुरुवातीपूर्वी केवळ एकच कसोटी त्याच्या नावावर असताना, डावखुरा फिरकी गोलंदाज मोतीने चमकदार कामगिरी केली. वेस्ट इंडिजने गेल्या महिन्यात झिम्बाब्वेमध्ये 1-0 ने मालिका जिंकली होती.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 19 बळी घेत, मोतीने बुलावायो येथे विजयी दुसऱ्या कसोटीत 13/99 अशी ऐतिहासिक आकडेवारी नोंदवली होती. कसोटी इतिहासातील वेस्ट इंडिजच्या फिरकीपटूची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com