Team India त पुनरागमनासाठी सज्ज झाला खेळाडू, नाव ऐकताच थरथरतात विरोधक!

T-20 World Cup: टी-20 विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Indian Team For T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला सराव सामना रोमहर्षक पद्धतीने 6 धावांनी जिंकला. दरम्यान, टीम इंडियासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भारताचा एक स्टार क्रिकेटर तंदुरुस्त झाल्याने टीम इंडियामध्ये परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

दुखापतीतून सावरणारा खेळाडू

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे 2022 च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडला होता. यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दाखल झाला होता. आशिया कपमध्येही तो अवघे दोन सामने खेळून बाहेर पडला होता. गेल्या महिन्यात त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आता त्याच्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. तो दुखापतीतून सावरला आहे.

Team India
T-20 World Cup मध्ये विराट करणार ओपनिंग? रोहितने दिले धक्कादायक उत्तर

जडेजाने हा व्हिडिओ शेअर केला

रवींद्र जडेजाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो धावताना दिसत आहे. जडेजाने सोशल मीडियावर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगितले. 'मी अनेक लोकांचे त्यांच्या सहकार्याबद्दल आभार मानू इच्छितो. बीसीसीआय (BCCI), माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, फिजिओ, डॉक्टर आणि चाहते यांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद मानतो,' असे जडेजाने म्हटले आहे.

Team India
T-20 World Cup मध्ये रोहितसोबत ओपनिंग करणार हा खेळाडू, गौतम गंभीरचा मोठा दावा

भारतासाठी तिन्ही फॉरमॅट खेळतो

रवींद्र जडेजाने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. टीम इंडियासाठी तो क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. तो त्याच्या किलर गोलंदाजी आणि धूर्त फलंदाजीत माहिर आहे. जडेजाने भारतासाठी (India) 60 कसोटी सामने, 171 एकदिवसीय सामने आणि 64 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियासाठी 242 विकेट घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com