कसोटी मालिकेआधी भारताला मोठा झटका; रोहितनंतर आणखी एक खेळाडू मालिकेला मुकण्याची शक्यता

गोमंतक ऑनलाईन टीम
सोमवार, 7 डिसेंबर 2020

ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना रविंद्र जडेजाच्या डोक्याला दुखापत झाली होती. तसेच त्याला हॅमस्ट्रींगचाही त्रास जाणवल्याने या सामन्यात तो क्षेत्ररक्षणासाठी येऊ शकला नव्हता.

कॅनबेरा- दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताने एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खिशात घातली आहे. पहिल्या सामन्यात भारताला विजयासाठी निर्णायक धावसंख्येपर्यंतर पोहोचण्यासाठी महत्वपूर्ण खेळी साकारणाऱ्या रविंद्र जडेज या सामन्यात दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली. मात्र, कसोटी मालिकेसाठीही जडेजा मुकण्याची शक्यता आहे. 

ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या सामन्यात फलंदाजी करताना रविंद्र जडेजाच्या डोक्याला दुखापत झाली होती. तसेच त्याला हॅमस्ट्रींगचाही त्रास जाणवल्याने या सामन्यात तो क्षेत्ररक्षणासाठी येऊ शकला नव्हता. मात्र, यानंतर त्याच्या आणि भारतीय संघाच्या अडचणींमध्ये यामुळे वाढ झाली आहे. जडेजाला दुखापतीतून सावरण्यासाठी कमीत कमी तीन आठवडे मैदानाबाहेर रहावे लागण्याची शक्यता आहे. भारत ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान येत्या १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटीत तसेच दुसऱ्या कसोटीतही जडेजाला खेळता येणार नाही.
  
बीसीसीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आयसीसीच्या कन्कशन नियमानुसार एखाद्या खेळाडूच्या मेंदूला दुखापत झाल्यास त्याला एक आठवडा विश्रांती घ्यावीच लागते. त्यामुळे ११ डिसेंबरला होणाऱ्या सराव सामन्यात जडेजाला भाग घेता येऊ शकेल. मात्र, त्याच्या डोक्यापेक्षा जास्त दुखापत हॅमस्ट्रींगला झाली असल्याने त्याला याचा अधिक त्रास होत असल्याचे वृत्त आहे. भारत 'अ' व ऑस्ट्रेलिया 'अ' यांच्यादरम्यान पहिल्या सराव सामन्याच्या पार्श्वभूमीवर जडेजाच्या कन्कशनच्या दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी बाहेर राहणार असल्याचे समालोचकाने म्हटले आहे. मात्र, बीसीसीआयने तो दुखापतीतून सावरला असल्याचे म्हटले आहे. 
 
 
 

संबंधित बातम्या