आता मिशन WTC Final! विराटसह 'हे' खेळाडू IPL प्लेऑफपूर्वीच जाणार इंग्लंडला

भारतीय संघाला जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी चॅम्पिनयनशीप 2021-23 स्पर्धेची फायनल खेळायची आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Virat Kohli leave for WTC final in London: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात असून 23 मे पासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. 28 मे रोजी आयपीएलच्या या 16 व्या हंगामाचा अंतिम सामना होणार आहे.

या आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघाला कसोटी चॅम्पिनयनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामना खेळायचा आहे. त्यादृष्टीने आता बीसीसीआयची तयारी सुरु झाली आहे.

भारतीय संघाला 7 ते 11 जून दरम्यान पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी चॅम्पिनयनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.

या सामन्यासाठी आता भारतीय खेळाडू वेगवेगळ्या गटाने लंडनला पोहचणार आहेत. पहिला गट 23 मे रोजी पहाटे लंडनला जाणार आहे. पहिल्या गटात स्टार फलंदाज विराट कोहलीचाही समावेश आहे.

Team India
IPL 2023 Playoff Timetable: टॉप चार संघ निश्चित! केव्हा होणार प्लेऑफच्या मॅच, पाहा संपूर्ण वेळापत्रक

विराटबरोबरच त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील संघसहकारी मोहम्मद सिराज देखील लंडनला जाणार आहे. याशिवाय आयपीएल 2023 स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघातील खेळाडू जे कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाचा भाग आहेत, ते खेळाडूही 23 मे रोजीच लंडनला निघणार आहेत.

यामध्ये आर अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर हे खेळाडूही आहेत. तसेच उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह असला, तरी हे खेळाडूही पहिल्या गटासहच लंडनला जातील. त्याचबरोबर या गटासह भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफदेखील लंडनला रवाना होईल.

सध्या अद्याप आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफचे सामने बाकी असल्याने काही खेळाडू हे सामने संपल्यानंतर लंडनला जातील. 28 मे रोजी आयपीएल 2023 हंगाम संपणार आहे. प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी जागा मिळवली आहे.

त्यामुळे या संघांचा भाग असलेले रोहित शर्मा, ईशान किशन, शुभमन गिल, मोहम्मद शमी, केएस भरत आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू अंतिम सामन्यानंतर लंडनला जाण्याची शक्यता आहे. तसेच कसोटी चॅम्पिटनशीपच्या अंतिम सामन्यासाठी राखीव खेळाडू म्हणून निवडलेले सूर्यकुमार यादव आणि ऋतुराज गायकवाड देखील दुसऱ्या गटासह लंडनला जाऊ शकतात.

त्याचबरोबर सध्या भारतीय संघातील फलंदाज चेतेश्वर सध्या इंग्लंडमध्येच आहे. तो काउंटी क्रिकेटमध्ये खेळत आहे.

Team India
WTC Final पूर्वी पुजारा - स्मिथ बनणार टिममेट्स, 'या' संघाकडून एकत्र खेळण्यास सज्ज

भारत दुसऱ्यांदा खेळणार अंतिम सामना

दरम्यान, कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्याची ही भारताची दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2021 साली पहिल्यांदाच झालेल्या कसोटी चॅम्पियनशीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यावेळी न्यूझीलंडने भारतावर 8 विकेट्सने मात केली होती.

असे आहेत कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ -

  • भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक).

    राखीव खेळाडू - ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सुर्यकुमार यादव

  • ऑस्ट्रेलिया संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार) , मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com