IPL 2023 चा हंगाम सुरु होण्यापूर्वीच RCB ला मोठा झटका, 'हा' स्टार अष्टपैलू खेळाडू...

RCB: आयपीएल 2023 चा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. जेतेपदासाठी सर्व संघांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे.
Virat Kohli
Virat Kohli Dainik Gomantak

IPL 2023: आयपीएल 2023 चा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. जेतेपदासाठी सर्व संघांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. मात्र आयपीएलपूर्वी खेळाडूंचा फिटनेस हा नेहमीच मोठा मुद्दा असतो. अनेक खेळाडू आधीच आयपीएलमधून बाहेर आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.

आरसीबीला मोठा धक्का

आयपीएल 2023 सुरु होण्यापूर्वी आरसीबी (RCB) संघाला मोठा झटका बसला आहे. खरं तर, यंदाच्या लिलावात आरसीबी संघात सामील झालेला विल जॅक्स दुखापतीमुळे 2023च्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावात आरसीबीने जॅक्सला 3.2 कोटी रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केले होते. ग्लेन मॅक्सवेलसह जॅक्स मधल्या फळीत चांगला फलंदाज होऊ शकला असता, पण आता तो आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

Virat Kohli
IPL 2023 मध्ये 'हा' गोलंदाज चमकणार! नंबर-1 दिग्गज खेळाडूचा मोडणार रेकॉर्ड?

नुकतीच दुखापत झाली होती

मीरपूर येथे इंग्लंड (England) आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली आणि या आठवड्याच्या सुरुवातीला स्कॅनिंग आणि तज्ञाशी सल्लामसलत केल्यानंतर त्याला आयपीएलमधून बाहेर काढण्यात आले. ही दुखापत जॅक्सच्या कारकिर्दीला मोठा धक्का आहे.

Virat Kohli
IPL 2023 पूर्वीच लखनऊच्या संघाने घेतला मोठा निर्णय, टीम दिसणार नव्या अवतारात; Video

या खेळाडूला मिळणार संधी

आरसीबी टीमने जॅक्सच्या बदलीचा शोधही सुरु केला आहे. ESPNcricinfo नुसार, जॅक्सच्या जागी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेलचा संघात समावेश केला जाऊ शकतो.

ब्रेसवेल यापूर्वी कधीही आयपीएलमध्ये खेळला नाही आणि डिसेंबरच्या लिलावातही तो विकला गेला नव्हता. आरसीबी संघ या मोसमातील पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध 2 एप्रिल रोजी खेळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com