EURO CUP 2020 बद्दल गोव्यातल्या FOOTBALL प्रेमींना काय वाटत...
euro cup 2020 banner.jpg

EURO CUP 2020 बद्दल गोव्यातल्या FOOTBALL प्रेमींना काय वाटत...

यूएफा युरोपियन चॅम्पियनशिप (Uefa European Championship) स्पर्धेचा थरार  12 जून 2021 पासून रंगला आहे. फूटबॉल आणि गोव्यातील जनतेच वेगळ  नात आहे. त्यामुळे गोव्यात देखील या स्पर्धेचा उत्साह  पहायला मिळत आहे. फुटबॉल (Football) प्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे मनोरंजनाची परवणीच आहे. युरो स्पर्धा मागील वर्षी 2020 मध्येच होणार होती, परंतु कोरोना (Corona) महामारीमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे गोव्यासह संपुर्ण जगातील फुटबॉलप्रेमी, चाहते या स्पर्धेची प्रकर्षाने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली असुन युरोचा थरार दिवसागणिक जास्तच रंगतदार होत आहेत. तेव्हा या सामन्याच्या थेट प्रतिक्रिया आपण गोव्यातील फूटबॉलप्रेमींकडून घेतल्या आहे, त्या अशा.(Reactions of football lovers in Goa about euro cup 2020)

वास्को मध्ये राहणारा चंद्रदीप म्हणतो, "मला विश्वास आहे की इटली युरो 2020 जिंकेल.  प्रामुख्याने त्यांच्याकडे एक चांगली टीम असून अनुभवी खेळाडू आहेत.  इनसिग्ने, इमोबिलसह इटालीकडे निकोल बरेला,  लोकाटेली, चीसा, बरेला यांच्यासारखे  एक मजबुत मिड-फील्ड आहे.  डोन्नरम्मा सारखा जागतिक दर्जाच्या गोलकीपर आणि डिफेन्स मध्ये  चिलीलिनी आणि बोन्युसीसारखे दिग्गज देखील इटलीला एक चांगला संघ बनवून देतात. स्पर्धा जिंकण्यासाठी परिपूर्ण साचा आवश्यक आहे आणि तो इटलीकडे आहे.  खरोखरच सर्व अनुभवासह विश्वास ठेवणारा संघ व्यवस्थापक रॉबेर्टो मॅन्सिनी, अझझुरीला त्यांच्या 2 रा युरोपियन गौरवाने मार्गदर्शन नक्की करेल."

"युरो मधील माझी आवडती टीम पोर्तुगाल आहे. मला विश्वास आहे की पोर्तुगालचा संघात योग्य प्रकारचा मिलाफ आहे आणि त्यांना जामीन देण्यासाठी आता रोनाल्डोवर अवलंबून राहण्याची गरज नाही. पोर्तुगालचा ब्रुनो फर्नांडिस हा देखील काही दिवसांपासून तुफान फॉर्मात असुन आपल्या संघाने 2016 सारखा युरो या वर्षी देखील जिंकावा असा विश्वास खेळाडु नक्कीच करत असतील."  2016 सारखा पुन्हा पोर्तुगाल  युरोचा मानकरी ठरेल असा विश्वास पणजीच्या संरॉय  डिसुझाने व्यक्त केला आहे. 

"स्पर्धेत जाण्यापूर्वी कोणत्याही संघाला 'सर्वोत्तम' संघ म्हणता येत नाही, कारण  काही संघांचा जरी दबदबा असेल तरी ते बऱ्याच वेळा फक्त कागदावरच दिसुन येतो. म्हणूनच, सर्वोत्कृष्ट टीम-प्ले दाखवणा देशाला हा किताब मिळवता येतो. मला असं वाटतं की युरो 2020 या वर्षी फ्रांस जिंकेल. 2018 चा फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचे मनोधैर्य नक्कीच उंचावलेले असेल. युरो 2016 चा अंतिम सामना हरलेल्या फ्रांस नक्की परतफेड करण्यास उत्सुक असेल," असा विश्वास मडगावच्या विष्णु शेट्टी ने दाखवला आहे.  

युरो 2020 मध्ये मी पोर्तुगाल चे समर्थन करतो.  मला विश्वास आहे की ही स्पर्धा जिंकण्याची त्यांच्यात क्षमता आहे. माजी चॅम्पियन असल्याने तेथे दबाव वाढेल आणि त्यांचा गट जरी ग्रुप ऑफ डेथ म्हुणुन ओळखला जातोय, मला खात्री आहे की ते अडथळा पोर्तुगालचे खेळाडु पार करतील. संघात सामना जिंकवून देणारे ब्रूनो आणि रोनाल्डो सारखे दिग्गज आहेत," असे आणखी एका फ़ुटबाँल फॅन संकेत रेवाडेकर चे म्हणणे आहे.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com