ISL 2021 : चेन्नईयीनच्या बचावफळीत रीगन कायम

रीगनच्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीची सुरवात 2012 साली झाली. त्या मोसमात तो आय-लीग स्पर्धेत रॉयल वाहिंगडोह संघातर्फे खेळला.
ISL 2021 : चेन्नईयीनच्या बचावफळीत रीगन कायम
एफसीने रीगन सिंगला कायम राखलेDainik Gomantak

पणजी : इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धा दोन वेळा जिंकलेल्या चेन्नईयीन एफसीने (Chennaiyin FC) बचावफळीत रीगन सिंग (Reagan Singh) याला कायम राखले आहे. तो चेन्नईतील संघातर्फे 2023 पर्यंत खेळेल.

मणिपूरचा तीस वर्षीय रीगन 2020-21 मोसमातील गोव्यात झालेल्या आयएसएल स्पर्धेत चेन्नईयीन एफसी संघात दाखल झाला होता. त्यापूर्वी त्याने गुवाहाटीच्या नॉर्थईस्ट युनायटेडचे प्रतिनिधित्व केले होते. आगामी दोन वर्षांसाठी आपल्यावर विश्वास दाखविल्याबद्दल रीगनने चेन्नईयीन परिवाराचे आभार मानले आहेत. या संघातर्फे पहिल्या मोसमात आपण चांगले योगदान दिले, तसेच खेळाडू या नात्याने प्रगती साधल्याचा विश्वास वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. चेन्नईयीनला आयएसएल करंडक जिंकून देण्यास मदत करण्याचे त्याचे लक्ष्य आहे.

एफसीने रीगन सिंगला कायम राखले
Goa : डिसेंबर पर्यंत गोव्यात 150 प्रकल्प होणार पुर्ण - मुख्यमंत्री

रीगनच्या व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीची सुरवात 2012 साली झाली. त्या मोसमात तो आय-लीग स्पर्धेत रॉयल वाहिंगडोह संघातर्फे खेळला. शिलाँगमधील या संघाचे तीन वर्षे प्रतिनिधित्व केल्यानंतर तो नॉर्थईस्ट युनायटेड संघात झाला आणि आयएसएल स्पर्धेत पाच वर्षे खेळण्याचा अनुभव प्राप्त केला. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत तो चेन्नईयीनकडून 18 सामने खेळला, त्यात संघाने सहा लढतीत एकही गोल स्वीकारला नाही. रीगनने एका असिस्टचीही नोंद केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com