ICC Awards: एमर्जिंग प्लेअर पुरस्कारावर 'या' भारतीय क्रिकेटरने उमटवली मोहर, रेकॉर्डही घातक

आयसीसीने एमर्जिंग प्लेअर पुरस्कार 2022 विजेत्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.
Renuka Singh - Harmanpreet Kaur
Renuka Singh - Harmanpreet KaurDainik Gomantak

ICC Awards 2022: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू 2022 पुरस्कार विजेत्या खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यानुसार सर्वोत्तम उदयोन्मुख महिला क्रिकेटपटू 2022 पुरस्कार भारताची 26 वर्षीय वेगवान गोलंदाज रेणूका सिंग हिला मिळाला आहे.

आयसीसी सर्वोत्तम उदयोन्मुख महिला खेळाडू 2022 पुरस्कारासाठी रेणूकासह भारताची यास्तिका भाटिया, ऑस्ट्रेलियाची डार्सी ब्राऊन आणि इंग्लंडची एलिस कॅप्सी यांना नामांकने मिळाली होती. पण रेणूकाने चौघींमध्ये बाजी मारत पुरस्कारावर नाव कोरले.

Renuka Singh - Harmanpreet Kaur
ICC ODI Team 2022 मध्येही भारतीय क्रिकेटर्सचेच वर्चस्व! 5 खेळाडूंना मिळाली संधी, हरमनप्रीत कर्णधार

तिने 2022 वर्षात भारताकडून शानदार कामगिरी केली होती. तिने 2022 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 29 सामन्यांतच 40 विकेट्स घेतल्या. यामध्ये तिने वनडे क्रिकेटमध्ये 14.88 च्या सरासरीने आणि 4.62 च्या इकोनॉमी रेटने 18 विकेट्स घेतल्या.

तसेच आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये तिने 23.95 च्या सरासरीने आणि 6.50 च्या इकोनॉमी रेटने 22 विकेट्स घेतल्या. तिच्यावर आता भारतीय महिला संघात झुलन गोस्वामीची जागा भरून काढण्याची जबाबदारी आहे. तिने वनडेत 2022 वर्षात केवळ 7 सामने खेळले, पण 18 विकेट्स घेताना तीन वेळा 4 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

रेणूकाने राष्ट्रकुल स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले होते, त्याचबरोबर तिने आशिया चषकातही चांगली कामगिरी करताना प्रभावित केले होते. आशिया चषक 2022 अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू देखील ठरलेली.

Renuka Singh - Harmanpreet Kaur
ICC Women's T20I Team मध्येही टीम इंडियाचीच हवा! मानधना-दीप्तीसह 4 महिला क्रिकेटपटूंना स्थान

तिची लक्षवेधक कामगिरी राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात झाली होती. तिने त्या सामन्यात 18 धावा देत 4 विकेट्स मिळवल्या होत्या. तिने ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हेली, कर्णधार मेग लेनिंग, बेथ मूनी आणि ताहलिया मॅकग्रा या प्रमुख विकेट्स त्या सामन्यात मिळवल्या होत्या. त्यावेळी तिने तब्बल 16 चेंडू निर्धाव टाकले होते.

मार्को यान्सिन सर्वोत्तम उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटू

मार्को यान्सिनने आयसीसी सर्वोत्तम उदयोन्मुख पुरुष क्रिकेटपटू 2022 पुरस्कारावर नाव कोरले आहे. हा पुरस्कार जिंकताना त्याने भारताचा अर्शदीप सिंग, न्यूझीलंडचा फिन ऍलेन आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झाद्रान यांना मागे टाकले आहे. या तिघांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com