देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : लिअँडर

Dainik Gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

एफसी गोवा संघाच्या उदयोन्मुख बचावपटूचे मेहनतीस प्राधान्य

पणजी

एफसी गोवा संघाने आगामी मोसमासाठी करारबद्ध केलेला उदयोन्मुख बचावपटू लिअँडर डिकुन्हा याने खडतर मेहनतीच्या बळावर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत छाप पाडण्याचेतसेच भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय बाळगले आहे.

कुंकळ्ळी येथील या २२ वर्षीय बचावपटूस एफसी गोवाने २०२३ पर्यंत करारबद्ध केले आहे. गतमोसमात लिअँडरने एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघाचे कर्णधारपद सांभाळले होतेआता त्याला सीनियर संघात बढती मिळाली आहे.

‘‘आयएसएल स्पर्धेत खेळण्याचे आणि राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे येत्या काही वर्षांतील ध्येय आहे. त्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. एकावेळी एकच मोसम हे उद्दिष्ट बाळगले आहे,’’ असे लिअँडरने सांगितले.

एफसी गोवाच्या सीनियर संघात संधी मिळणे ही स्वप्नपूर्ती असून मागील तीन मोसमात डेव्हलमेंट संघातून खेळताना केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची मनीषा लिअँडर याने व्यक्त केली. ‘‘यापुढील आव्हाने आणि संधी याकडे मी आश्वासकपणे पाहत आहे,’’ असे लिअँडर आत्मविश्वासाने म्हणाला.

एफसी गोवाच्या सीनियर संघात स्थान मिळाल्यामुळे संघासाठी करंडक जिंकणे आणि मोसम यशस्वी करण्याचे लक्ष्य आपण बाळगल्याचे बचावफळीत राईट बॅक जागी खेळणाऱ्या या फुटबॉलपटूने नमूद केले. एफसी गोवा संघातील खेळाडूंसमवेत सराव करण्यासाठी आणि त्यांच्याकडून शिकण्यासाठी आतूर असल्याचे तो म्हणाला.

 लिव्हरपूलच्या रॉबर्टसनचा चाहता

लिअँडर इंग्लिश प्रीमियर लीग विजेत्या लिव्हरपूर संघाचा बचावपटू अँड्र्यू रॉबर्टसन याचा चाहता आहे. याविषयी त्याने सांगितलेकी ‘‘तो अष्टपैलू आहे. तो संघाला आक्रमणाततसेच बचावातही मदत करतो. मी त्याच्या शैलीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यातून शिकत आहे.’’

 ‘‘एफसी गोवाच्या डेव्हलमेंट संघातून खेळताना मागील तीन वर्षांत खूप प्रगती साधता आली. मैदानावर जास्त वाव मिळालात्यामुळे अनुभवातही भर पडली. डेरिक (परेरा) व क्लिफर्ड (मिरांडा) या प्रशिक्षकांकडून बऱ्याच कल्पना आणि सूचना लाभल्याज्यांचा खेळ उंचावण्यात लाभ झालाय.’’

- लिअँडर डिकुन्हाएफसी गोवाचा बचावपटू

संबंधित बातम्या