आरएफवायस चा नेलिम एफसी गोवा संघात

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

नवी मुंबई येथील रिलायन्स फौंडेशन यंग चँप्स (आरएफवायसी) अकादमीतील प्रशिक्षणार्थी मुहम्मद नेमिल एफसी गोवा संघात दाखल झाला आहे. त्याच्यासह अकादमीतील नऊ युवा फुटबॉलपटूंनी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील संघांनी करारबद्ध केले आहे. 

पणजी : नवी मुंबई येथील रिलायन्स फौंडेशन यंग चँप्स (आरएफवायसी) अकादमीतील प्रशिक्षणार्थी मुहम्मद नेमिल एफसी गोवा संघात दाखल झाला आहे. त्याच्यासह अकादमीतील नऊ युवा फुटबॉलपटूंनी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील संघांनी करारबद्ध केले आहे. 

सर्व नऊ खेळाडू आरएफवायसीच्या पहिल्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी आहेत. अरित्र दास, मुहम्मद बासिथ पीटी, बिरेंद्र सिंग यांना केरळा ब्लास्टर्सने, जी. बालाजी व आकिब नवाब यांना चेन्नईयीन एफसीने, थोई सिंगला बंगळूर एफसीने, आयुष छिकारा याला मुंबई सिटी एफसीने, तर कौस्तव दत्ता याला हैदराबाद एफसीने करारबद्ध केले आहे. बालाजी व नवाब यांचा यांचे करार दोन वर्षांचे, तर इतर सर्व खेळाडूंचे करार तीन वर्षांचे आहेत.

आरएफवायसीच्या युवा खेळाडूंनी आयएसएलसोबत व्यावसायिक फुटबॉलचा प्रवास सुरू केला ही आमच्यासाठी फार अभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया रिलायन्स फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता अंबानी यांनी दिली.

आरएफवायसी अकादमी २०१५ साली कार्यरत झाली होती. गेली पाच वर्षे या खेळाडूंनी आरएफवायसीत व्यतित केली. भारताला फुटबॉलमध्ये ताकदवान बनविण्याच्या हेतूने आरएफवायसी देशातील युवा फुटबॉल गुणवत्ता हुडकून त्यांना प्रशिक्षित करते. या वर्षी आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) आरएफवायसीला टू-स्टार अकादमीचा दर्जा दिला होता. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) २०१९ साली या अकादमीस फाईव्ह-स्टार मानांकन दिले होते. गतवर्षी आरएफवायसी अकादमीत २२ नवे प्रशिक्षणार्थी रूजू झाली, त्यामुळे एकूण प्रशिक्षणार्थींची संख्या आता ६५ झाली आहे.

संबंधित बातम्या