आयपीएल संपताच पाँटिंग ऑस्ट्रेलियाच्या मदतीला

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

आयपीएलमध्ये दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग मायदेशी परतताच ऑस्ट्रेलिया संघाच्या मदतीला धावले आहेत. संघाच्या नेटमध्ये ते प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांना मदत करत आहेत.

सिडनी : आयपीएलमध्ये दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंग मायदेशी परतताच ऑस्ट्रेलिया संघाच्या मदतीला धावले आहेत. संघाच्या नेटमध्ये ते प्रशिक्षक जस्टीन लॅंगर यांना मदत करत आहेत.

आयपीएलमध्ये दिल्लीसंघासह इतर संघातून खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंबाबतची नोंदविलेली निरीक्षणे आपल्या संघाला देण्याची तत्परता पाँटिंग यांनी दाखवली. इतकेच नव्हे तर नेटमध्ये जाऊन त्यांच्या फलंदाजांनी थ्रोडाऊन केले. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना २७ तारखेला होत असल्याने पाँटिंग यांनी जराही वेळा वाया घालवला नाही.

काही दिवसांचेच कॉरंटाईन करावे लागल्याने पाँटिंग यांना त्यानंतर मिळालेल्या वेळेचे महत्त्व होते. सुरुवातीपासून सराव संपेपर्यंत ते उपस्थित होते, अशी माहिती स्टॉयनिसने दिली. पाँटिंग प्रशिक्षक असलेल्या दिल्ली संघात स्टॉयनिस महत्त्वाचा खेळाडू होता. पाँटिंग यांचे मार्गदर्शन मला मोलाचे ठरले. मार्गदर्शन करताना दिलेला वेळ महत्त्वाचा ठरलेला आहे. ते केवळ लांबून सल्ले देत नाहीत तर स्वतः हातात बॅट घेऊन मार्गदर्शन करत असतात, असे स्टॉयनिसने सांगितले.

संबंधित बातम्या